शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

एनआयआरएफ जाहीर ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सर्वसाधारण क्रमवारीत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 5:26 PM

केंद्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर

पुणे : केंद्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर करण्यात आले असून देशातील विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ अकराव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी नवव्या क्रमांकावर असणा-या पुणे विद्यापीठाची यंदा दोन क्रमांकाने घसरण झाली आहे. पुणे विद्यापीठात देशातील शैक्षणिक संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विसाव्या क्रमांकावर असून संशोधन क्षेत्रात पुणे विद्यापीठाने देशात 37 वा क्रमांक मिळवला आहे.

देशातील शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी.जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत देशातील विद्यापीठांची नावे पहिल्या 100 ते 200 विद्यापीठांच्या यादीत  यावीत, या अपेक्षेने केंद्र शासनाने एनआयआरएफ रँकिंग जाहीर करण्यास सुरूवात केली. त्यानुसार 2021 चे रँकिंग प्रसिध्द करण्यात आले आहे.त्यात सर्व  शैक्षणिक संस्थांचे सर्वसाधारण रँकिंग, विद्यापीठांचे रँकिंग तसेच अभियांत्रिकी ,व्यवस्थापनशास्त्र , औषध निर्माणशास्त्र,वास्तूशास्त्र,वैद्यकीय,दंत वैद्यकीय विधी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे व शैक्षणिक संस्थांचे रँकिंग जाहीर केले आहे.संशोधन क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेवून स्वतंत्रपणे रँकिंग प्रसिध्द करण्यात आले असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉब्मे देशात तिस-या क्रमांकावर आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च दहाव्या क्रमांकावर  होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट -मुंबई तेराव्या क्रमांकावर, आयसर-पुणे सोळाव्या क्रमांवर, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी एकविसाव्या क्रमांकावर आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात 37 व्या तर विद्यापीठ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.--------- देशातील विद्यापीठांची क्रमवारी 1) इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स2) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ3) बनारस हिंदू विद्यापीठ4) कलकत्ता युनिव्हर्सिटी5) अमृता विश्व विद्यापीठ6) जामिता मिलिया इस्लामिया7) मनिपाल अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युशन8) जाधवपूर युनिव्हर्सिटी9) युनिव्हर्सिटी आॅफ हायद्राबाद10 )अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी11) सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी-------------------- गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे परदेशी विद्यार्थी विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन शिक्षण घेत नाहीत.तसेच परदेशातील प्राध्यापकांनाही येथे येऊन प्रत्यक्षात शिकवणे शक्य होत नाही.त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यापीठाचे रँकिंग दोन क्रमांकाने खाली आले आहे.प्रत्यक्ष शिक्षण सुरू होत नाही तोपर्यंत यात सुधारणा होणार नाही.- डॉ.नितीन करमळकर, कुलगुरू ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणuniversityविद्यापीठCentral Governmentकेंद्र सरकार