शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

निर्मला सीतारामन यांचे 'मिशन बारामती', मोदी-पवार सामना रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 2:59 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत...

राजू इनामदार/दुर्गेश मोरे

पुणे :शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे जाहीरपणे जेथे सांगितले तोच बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली आहे. शिष्याने गुरूला त्याच्या घरच्या आखाड्यातच शड्डू ठोकून आव्हान देण्याचा हा प्रकार देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. त्यातूनच उमेदवार कोणीही असले तरी हा सामना मोदी - पवार असाच रंगणार असल्याचे आताच दिसू लागले आहे. कारण पवार यांनीही मोदींना मात देण्यासाठी त्यांची खास मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

लोकसभेच्या सन २०२४ च्या निवडणुकीला अजून १८ महिने शिल्लक आहेत, तोच भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवातही केली आहे. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमाकांवर असलेले देशभरातील १४४ लोकसभा मतदारसंघ निवडून तिथे संघटनात्मक बांधणीबरोबरच पक्षाला हितकारक ठरतील, अशा राजकीय घडामोडीही घडवून आणल्या जात आहेत. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघ प्रमुख लक्ष्य करण्यात आला आहे.

देशाला काँग्रेसचे अनेक पंतप्रधान दिलेल्या अमेठी मतदारसंघात भाजपने सन २०१९ मध्ये थेट राहुल गांधी यांचाच पराभव केला. त्यानंतर काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा आत्मविश्वासच गमावला. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची देशस्तरीय मोट बांधू पाहणाऱ्या शरद पवार यांना तसाच धक्का बारामती लोकसभा मतदारसंघात देण्याचा भाजपचा विचार असल्याचे दिसते आहे. त्यामुळेच त्यांची या प्रचारदौऱ्याची टॅगलाईनच ‘अमेठी मिळतो तर बारामती का नाही‘ अशी आहे.

पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सन २००९ पासून त्या निवडून येतात. त्यांच्या आधी दस्तुरखुद्द शरद पवार निवडून येत होते. इथला मतदार सातत्याने पवार यांच्याबरोबर राहिला असल्याचे दिसते. ही मक्तेदारी मोडीत काढायची, असा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष निवडणुकीला बराच अवधी असला तरीही आतापासूनच नगारे वाजवण्यास सुरुवात केली जात आहे. त्यामुळेच सीतारामन यांचे असे तीन दौरे येत्या १८ महिन्यांच्या कालावधीत होणार आहेत, असे भाजपाकडून सांगितले जात आहे. संघटनात्मक बांधणी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनोबल उंचावणे, त्यांना पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देणे आदी जबाबदारी सीतारामन यांच्याकडे देण्यात आली असल्याचे समजते.

भाजपचे मायक्रोप्लॅनिंग

असे आहे भाजपाचे बारामती मिशन

  • केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मतदारसंघाची जबाबदारी
  • एकूण दौरा ३ दिवसांचा
  • दौऱ्याबाबत जाहीर मुलाखती, वृत्तांकन याचे नियोजन
  • केंद्रीय मंत्र्यांसमवेत मतदारसंघाबाहेरचा एक आमदार नियोजनासाठी
  • पक्षाचा राज्यस्तरावरील एक वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तयार करण्यासाठी
  • लोकसभा मतदारसंघातील ६ ही विधानसभा मतदारसंघात दौरा व जाहीर कार्यक्रम
  • सर्व मिळून एकूण २१ कार्यक्रम. त्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका
  • मतदारसंघातील देवस्थानांचे जाहीर दर्शन
  • मतदारसंघात स्थानिक आमदार असेल तर त्यांच्याकडे किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे केंद्रीय मंत्र्यांचा मुक्काम
  • अखेरची बैठक विभागीय आयुक्त, किंवा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत. केंद्रीय योजनांचा त्या मतदारसंघातील आढावा
  • आगामी १८ महिन्यांच्या कालावधीत असे तीन दौरे

राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी

  • मतदारसंघाला लक्ष्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. खुद्द शरद पवार यांनीच नियोजनात लक्ष घातले असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडून जाहीरपणे काहीच करण्यात येत नाही. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांचे मतदारसंघातील दौरे वाढले असून, त्याही आता कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन जाहीर वक्तव्ये करत आहेत.
  • पुणे महापालिकेच्या हद्दीत बारामती लोकसभा मतदारसंघाचा काही भाग येतो. तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खासदार सुळे यांना जोडून देण्यात आले आहेत. तेथील प्रश्नांबाबत सुळे वारंवार महापालिका आयुक्तांसमवेत बैठका घेत आहेत.
  • मतदारसंघात दौरा करून प्रत्यक्ष मतदारांबरोबर संपर्क साधण्यात येत आहे.
  • भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेला सुळे यांच्याकडून शांतपणे, मुद्देसूद प्रत्युत्तर दिले जात आहे.
  • सीतारामन यांच्या दौऱ्यांमुळे काहीही फरक पडला नसल्याचे दाखवण्यात येत आहे.

राजकीय स्थिती

  • दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला असे ६ विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतात.
  • यातील दौंड (आमदार राहुल कुल) व खडकवासला (भीमराव तापकीर) विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात
  • पुरंदर (आमदार संजय जगताप) व भोर (आमदार संग्राम थोपटे) विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे
  • काँग्रेस राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असला तरी स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसचे दोन्ही आमदार पवारविरोधी
  • इंदापूर (आमदार दत्ता भरणे) बारामती (आमदार अजित पवार) विधानसभा राष्ट्रवादीकडे मात्र त्यातील इंदापूरमध्ये वर्चस्व असलेले हर्षवर्धन पाटील आता भाजपात

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची स्थिती

सन २००९ -

सन २०१४ : राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांच्याविरोधात ७० हजारांचे मताधिक्य घेऊन सुप्रिया सुळे विजयी.

सन २०१९ : भाजपच्या कांचन कुल यांच्याविरोधात १ लाख ५० हजार मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी.

सन २०१९चे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या क्रमाने

दौंड - ८४११४ - ९१,१७१

इंदापूर - १,२३,५७५ - ५२,६३८

बारामती - १,७४,९८६ - ४७,०६८

पुरंदर - ७९,६८७ - ९५,१९१

भोर - १,०९,१६३ - ९०,१५९

खडकवासला - ८६,९६३ - १,५२,४८७

राजकीय बलाबल

भाजपची सगळी मदार विरोधात असलेल्या चार विधानसभा मतदार संघांवर आहे. त्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघातील हर्षवर्धन पाटील यांनी थेट भाजपत प्रवेश केला आहे. सन २०१९मध्ये ते काँग्रेसमध्ये होते व काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होती. त्यावेळी सुळे यांना इंदापूरमधून सव्वालाख मते मिळाली होती. हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यात मोठी घट होण्याची भाजपला खात्री वाटते आहे.

- भोर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, तो शरद पवार यांच्यामुळे प्रत्यक्षात आला नाही, असा थोपटे समर्थकांचा आरोप आहे. त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे.

- पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत. या जगताप घराण्याबरोबरही पवार घराण्याचे राजकीय सख्य नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे जगताप कितपत क्षमतेने बरोबर राहतील, याविषयी शंका व्यक्त केल्या जातात.

- खडकवासला विधानसभा तर भाजपच्याच ताब्यात आहे. सलग तिसऱ्या वेळी तिथे भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. याच मतदारसंघात सुळे यांना सन २०१९मध्ये कमी मतदान झाले होते.

- दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सन २०१९च्या भाजपच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार होत्या. याही मतदारसंघात सुळे यांना सन २०१९मध्ये कमी मतदान झाले होते.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस