लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : जगद्गुरू तुकोबारायमहाराज व ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्यात राज्य शासन, सेवा सहयोग संस्था यांच्यामार्फत राबवित असलेल्या निर्मलवारीमुळे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी होत असलेली दुर्र्गंधी मिटवण्यात यश यत आहे. पालखी सोहळ्यात निर्मलवारी यशस्वी करण्यासाठी रात्रभर स्वयंसेवक वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याचे काम करीत असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी सांगितले.संत तुकाराममहाराज संस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा सहयोग संस्था यांच्या मदतीने राज्य शासनाने ३३२ व्या पालखी सोहळ्यात गतवर्षीपासून निर्मलवारी उपक्रम राबविण्यात आला.संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्यात ८५० व तुकोबाराय पालखी सोहळ्यात ४०० फिरती शौचालये ठेवण्यात आली आहेत. तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात इंदापूर येथे आठ ठिकाणी ४०० शौचालय ठेवण्यात आली आहेत. स्वयंसेवक वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शिवले, युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस अभिजित देवकाते, पिंपळे जगतापचे सरपंच महेश जगताप, माजी उपसरपंच कांतिलाल फडतरे, नितीन गव्हाणे, विविका सोसायटीचे माजी अध्यक्ष जालिंदर शिवले, राजेंद्र तांबे , प्रदीप काशिद, एकनाथ शेलार, दीपक कोहकडे, दिलीप हिंगे, मितेश गादीया, अक्षय फराटे आदी उपस्थित होते.
निर्मलवारी यंदाही होणार यशस्वी!
By admin | Published: June 29, 2017 3:33 AM