शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

निरूप्रदवी, पण प्रभावशाली पुष्पाैषधी- निरामय लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:09 AM

------------------- डॉ. बाख यांची पुष्पौषधी उपचार पद्धती ही सूक्ष्मपातळीवर काम करणारी आहे. शरीरास किंवा मानसिक विकार झाल्यास औषध घ्यावेच, ...

-------------------

डॉ. बाख यांची पुष्पौषधी उपचार पद्धती ही सूक्ष्मपातळीवर काम करणारी आहे. शरीरास किंवा मानसिक विकार झाल्यास औषध घ्यावेच, पण या पद्धतीत त्याहून सूक्ष्म अशा मानसिक पातळीवर उपचार होतो. रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करणे शक्य होते.

आपणा सर्वांमध्ये रोग पूर्ण बरा करण्याची ताकद आहे. पण काही मानिसक विकार झाले, विचारधारा, दृष्टिकोन चुकला की शरीरातील ऊर्जा-प्रणाली बिघडते. ऊर्जा अवरोध एनर्जी ब्लॉक तयार होतो व पुढे जाऊन हाच ऊर्जा अवरोध रोगाच्या लक्षणांच्या स्वरूपात दिसून येतो किंवा प्रत्यक्ष रोगाच्या रूपात अनुभवास येतो.

जोपर्यंत हा एनर्जी ब्लॉक पूर्णपणे विरघळून जात नाही, नष्ट होत नाही तोपर्यंत रोगाचे अस्तितत्व राहते. पुष्पौषधींमधील ऊर्जेच्या प्रवाहात हा ऊर्जा अवरोध पूर्णपणे विरघळून जातो. फुलांतील ऊर्जा वाहून नेण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे ही उपचारप्रणाली अत्यंत नैसर्गिक आहे.

काही गोष्टी प्रामुख्याने आपल्यासमोर येतात.

१) आरोग्य व आजार यांचे वेगळ्या पद्धतीने केलेले विश्लेषण, नुसत्या शरीर लक्षणांवरून नव्हे तर मन व आत्मा यांतील विसंवाद, नकारात्मक भावना, विचार व दृष्टिकोन यांच्या परिणामांचा विचार केला आहे. डॉ. बाख यांच्या मते रोग नसतोच, फक्त आजारी माणसं असतात. शिवाय या पद्धतीत विश्वबंधुत्व, सर्वसमावेशक प्रेम, विश्वप्रेम, आपल्याबरोबर इतरांचीही उन्नती यासारख्या आध्यात्मिक प्रेरणाही दिसून येतात. अर्थात, आम्हा भारतीयांना हे नवे नाही.

२) एक अगदी नवीन, आजच्या युगातील वेगळी अत्यंत शुद्ध, बिनविषारी, रसायनरहित, अत्यंत सोपी अशी ही उपचार पद्धती आहे. पुष्पौषधी या सरळ मनातील नकारात्मकतेवर परिणाम करीत असल्याने औषधाचा नको इतका मोठा जास्त डोस-ओव्हरडोस होत नाही. आपात्कालीन परिस्थितीत अगदी १० मिनिटांच्या अंतरानेही औषध घेता येते. पूर्णपणे दुष्परिणामरहित असल्याने एखादे वेगळेच औषध (पुष्पौषधी) घेतले गेले तर फक्त अपेक्षित परिणाम दिसणार नाही इतकेच काही वेगळे दुष्परिणाम निश्चितच संभवत नाहीत.

३) इतर उपचारपद्धतींची औषध योजना सुरू असतानाही पुष्पौषधी घेता येतात. त्याने रोग पूर्णपणे व लवकर बरा होण्यास मदतच होईल. कारण पुष्पौषधींनी मन स्वच्छ झाल्यानंतर शरीरही औषधास योग्य साध देईलच.

४) पुष्पौषधी उपचार पध्दती अतिशय निरूपद्रवी, सुरक्षित पण तितकीच परिणामकारक असल्याने त्यांचा वापर कोणीही करू शकतो. जसा सूर्यप्रकाशात बर्फ पूर्णपणे वितळतो, त्याचप्रमाणे पुष्पौषधीमधील ऊर्जेच्या प्रवाहात मनातील ऊर्जा-अवरोध विरघळून जाते.

५) या पद्धतीच्या वापरासाठी वैद्यकशास्त्राचे तसेच मानसशास्त्राचे फारसे ज्ञान असण्याची गरज नाही. रोग्याची सध्याची स्थिती कोणत्या विकारामुळे, नकारात्मक भावनेमुळे झाली आहे, हे ओळखता यायला हवे. त्याप्रमाणे औषध योजना करता येऊ शकते. त्यासाठी आकलनशक्ती, योग्य विचारशक्ती, परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करता येणे इत्यादी गोष्टींची गरज आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजारी व्यक्तीबद्दल दया, करूणा इत्यादी भावना मनापासून असणे फार जरूरीचे आहे. नैसर्गिक संवेदनशीलता व दुसऱ्याच्या भावनांचा आदर याची नितांत आवश्यकता आहे. समोरच्या व्यक्तीस तुम्ही नीट समजून घेतले नाहीत तर औषध काय देणार ? स्वत:साठी औषध घेतानासुध्दा याच गोष्टी लक्षात ठेवाव्यात. स्वत:स दोष न देता मैत्रीपूर्वक वातावरणात समस्या सोडवावी. हल्ली याच भावना तशा दुर्मीळ झाल्या आहेत म्हणा.

(वैज्ञानिक इशारा - सदर लेख फक्त मार्गदर्शक आहे. पुष्पौषधींचे सेवन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानेच करावे’)