उपसरपंच संध्या जगताप यांनी ठरलेल्या मुदतीत पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होते. सरपंच मंगेश काटेदेशमुख यांच्या अध्यक्षतेखालील उपसरपंचपदाची निवड घेण्यात आली. या पदासाठी निशिगंधा आदिनाथ जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच संध्या जगताप यांनी नूतन उपसरपंच निशिगंधा जाधव यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. याप्रसंगी ग्रामसेवक संतोष वसेकर, सदस्य सुनील शिर्के, आदित्य काटे, विशाल देवकाते, महिला सदस्या पल्लवी काटे, मनीषा काटे, राजश्री आडके यांच्यासह कारखान्याचे संचालक संजय काटेदेशमुख, माजी संचालक चिंतामणी नवले, आप्पासो काळे, अशोक जगताप, प्रशांत आडके, आदिनाथ जाधव, संजय काटे, राजेंद्र काटे वकील, प्रशांत काटे, हेमंत काटे, चिंतामणी नवले, चंद्रकांत काळे, संभाजी काटे, बापूराव शिर्के, अरुण जाधव, विकास काटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न करीन व शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
- निशिगंधा जाधव
उपसरपंच, माळेगाव खुर्द
माळेगाव खुर्द ता. बारामती येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी निशिगंधा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
०१०९२०२१-बारामती-०८
----------------------------