उपसरपंचपदासाठी नीता घेनंद यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भारती म्हस्के यांनी नीता घेनंद यांना बिनविरोध विजयी घोषित केले. याप्रसंगी ऋषिकेश पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शशिकला वैभव घेनंद, माजी उपसरपंच संतोष यादव, हेमा घेनंद, उज्वला घेनंद, ग्रामपंचायत सदस्य संतोष गांधिले, विठ्ठल थोरात आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच नीता घेनंद यांचा युवानेते ऋषिकेश पवार, बबन घेनंद - पाटील, माजी सरपंच बाळासाहेब बवले, प्रताप घेनंद, दादाभाऊ घेनंद, गोरक्ष घेनंद, बाळासाहेब किसन घेनंद, अरुण हलगे, बाळासाहेब घेनंद, रामभाऊ घेनंद, बाळासाहेब घेनंद, महेंद्र घेनंद, वैभव घेनंद, अर्जुन घेनंद, दत्तात्रय घेनंद, पांडुरंग घेनंद, नाना बवले एकनाथ गव्हाणे, सोमनाथ घेनंद, गोरक्ष बवले, विजय बवले आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
११ शेलपिंपळगाव घेनंद
उपसरपंच नीता घेनंद यांचा सत्कार करताना मान्यवर.