'पश्चिम महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे वाढणार, एसटीच्या तिकिटदरात मेट्रोचा प्रवास करता येणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 12:27 PM2021-09-24T12:27:44+5:302021-09-24T12:43:52+5:30
पुणे: वाघोली ते शिरूर 50 किलोमीटरचा नवा आराखडा तयार आहे. या रस्त्यादरम्यान तळमजल्यावर 8 लेन आणि पहिल्या मजल्यावर 6 ...
पुणे: वाघोली ते शिरूर 50 किलोमीटरचा नवा आराखडा तयार आहे. या रस्त्यादरम्यान तळमजल्यावर 8 लेन आणि पहिल्या मजल्यावर 6 लेनचा उड्डाणपूल होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात बोलताना दिली. उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी गडकरी बोलत होते. सागरी सेतू वसई-विरारपर्यंत नेण्याचा विचार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. तसेच दिल्लीला नरीमन पाईंटशी जोडण्याचा मानसही गडकरींनी व्यक्त केला.
'जिल्ह्यात मेट्रोचे जाळे वाढणार''
पुण्यापासून कोल्हापूर, सोलापूर, बारामती, नगर, लोणावळा या मार्गावरील ब्रॉडगेजवर आठ डब्ब्यांची मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमध्ये विमानासारखी सोय असणार आहे. याचे तिकीट एसटी बसएवढं असेल. ही मेट्रो 140 किमी प्रतितास वेगाने धावेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे लोकांचे पैसे वाचतील आणि पर्यावरणालाही फायदा होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
....तोपर्यंत मला पुन्हा भेटू नका- नितीन गडकरी
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.