पुणे: पुण्यातील मेट्रोच्या कामाचा वेग कौतुकास्पद आहे. सध्या शहरातील मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. भुयारी मेट्रो नेण्याचा सुरवातीला पेच होता, एका बैठकीत सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढला होता, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान दिली. जसा शेतकरी बैलाच्या मागे तुतारी घेऊन राहतात, तसं सरकारमध्ये प्रशासनामध्ये तुतारी घेऊन जो राहील त्याचंच काम होतं, असं गडकरी बोलताना म्हणाले.
" target="_blank" title="नितीन गडकरी Live:">
आजच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, मेट्रोचे काम पुढे गंल नाही म्हणून पुणेकरांनी मागे माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका केली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.