शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Supriya Sule: गडकरी साहेब, राज ठाकरे, तज्ञ नेते सांगतायेत राज्याची परिस्थिती अडचणीत; ही चिंतेची बाब - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 5:47 PM

कॅबिनेट मध्ये अनेक वेळा वित्त मंत्रालयाकडून विरोध केला जातो, परंतु कोणीही ऐकत नसून रेटून निर्णय घेतले जातात

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे. त्याबाबत सुप्रिया सुळेंनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. गडकरी साहेब, राज ठाकरे आणि काही तज्ञ असे नेते आणि लोक वारंवार महाराष्ट्राच्या परिस्थिती अडचणीत आहे असं सांगत आहे. महाराष्ट्र सरकार मधील लोक असं सांगत असेल तर ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.   

नितीन गडकरी यांनी त्यांच्या शैलीत भाष्य करत सरकारच्या भरवशावर राहू नका, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना दूर ठेवा. सरकार विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्यांना बुडवते. त्यामुळे जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल, केव्हा मिळेल याचा भरवसा नाही. अनुदान मिळेल की नाही माहिती नाही. असे सवाल उपस्थित केले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांनी सत्तेमध्ये असणाऱ्या गडकरी यांना विचारायला पाहिजे असं मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या,  महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. नितीन गडकरी यांनाच आजची माहिती जास्त असणार. गडकरी साहेब, राज ठाकरे आणि काही तज्ञ असे नेते आणि लोक वारंवार महाराष्ट्राच्या परिस्थिती अडचणीत आहे असं सांगत आहे. महाराष्ट्र सरकार मधील लोक असं सांगत असेल तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. आमचे जयंत पाटील सातत्याने यावर बोलत होते. पण कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. कॅबिनेट मध्ये अनेक वेळा वित्त मंत्रालयाकडून विरोध केला जातो. आणि त्याच्यावर कोणी ऐकत नाही. रेटून निर्णय घेतले जातात. जी परिस्थिती आत्ता ऐकायला मिळते त्याला सर्वस्वी ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. प्रचंड गडबड करून ठेवली आहे. उद्घाटन, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा एवढेच काम करत आहे. जेव्हा जयंत पाटील अर्थमंत्री होते तेव्हा हे राज्य सरप्लस राहिलेला आहे. 

धर्मवीर २ बाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही राजकारणात पॉलिसी मेकिंग साठी आलो आहे. सिनेमा हा असलाच पाहिजे सिनेमाही इंडस्ट्री आहे. मनोरंजन म्हणून पाहिला पाहिजे. सिनेमा हे राजकारण होऊ शकत नाही. ही घटना 23 वर्षांपूर्वी झाली आहे. इतक्या वर्ष तुम्ही सत्तेत होता. तुमचे नियत साफ असेल. तर टेलिव्हिजनवर बोलण्यापेक्षा पोलीस कमिशनर कडे गेल पाहिजे. होम मिनिस्टर तुमच्याकडेच आहे  असे म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.  

हर्षवर्धन पाटील अन् आमचे चांगले संबंध 

काही लोक मलाही भेटले त्यांची इच्छा आहे की तुतारी घेऊन राज्यभरात स्वाभिमान पद्धतीने लढावं. मानसन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे. लोकशाहीने चालणारा हा पक्ष चालतो. हर्षवर्धन पाटील यांना आदराने मी भाऊ म्हणते त्यांच्या आणि आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकांचे आहेत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते संबंध जपले जातील. ते जो काय निर्णय घेतील त्याचा आमच्या कौटुंबिक आणि राजकीय निर्णयाशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNitin Gadkariनितीन गडकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार