शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

पुण्यात जलवाहतूक सुरू होणार, नितीन गडकरी यांनीच प्रस्ताव मागविला - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 3:42 AM

पुण्याच्या मुठेतून जलवाहतूक सुरू करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवला असून पाटबंधारे विभागाने त्याची तयारी सुरू केली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असलेल्या या प्रयत्नाला लवकरच कागदोपत्री सविस्तर प्रस्तावाचे स्वरूप दिले जाईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

पुणे : पुण्याच्या मुठेतून जलवाहतूक सुरू करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवला असून पाटबंधारे विभागाने त्याची तयारी सुरू केली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असलेल्या या प्रयत्नाला लवकरच कागदोपत्री सविस्तर प्रस्तावाचे स्वरूप दिले जाईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.काही वर्षांपूर्वी जलवाहतुकीच्या विषयावर चर्चा झाली होती. पालकमंत्री बापट यांनी त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला. खासदार अनिल शिरोळे यांनी दिल्ली येथे गडकरी यांची भेट झाल्यावर त्यांच्याशी यावर चर्चा केली. त्यांनी यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, असे सांगितल्यावर खासदार शिरोळे यांनी तसे बापट यांना कळवले. बापट यांनी पाटंबधारे विभाग व अन्य काही सरकारी कार्यालयांबरोबर चर्चा करून याची सविस्तर माहिती मागवली आहे.प्रस्ताव तयार झाल्यानंतर राज्य सरकारच्या संमतीने तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, स्वत: गडकरी यात रस घेत आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत पाहता तेच याला अंतिम स्वरूपही देऊ शकतील, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.मुठेबरोबर पवनेतूनही जलवाहतूक शक्यमुठेतून अशा प्रकारे जलवाहतूक सुरू करता येणे शक्य आहे. तसेच पुढे ती पवना नदीत पिंपरी-चिंचवडमध्येही सुरू करता येईल. त्यासाठी नदीचे पाणी स्थिर ठेवणे, किती पाणी लागेल. वाहतुकीच्या बोटींसाठी लागणारे चॅनेल कसे तयार करता येतील, अशा अनेक तांत्रिक गोष्टी यामध्ये आहेत.संबंधितांना त्याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. प्रामुख्याने पाणी किती लागेल, असा प्रश्न आहे. तसेच थांबे कुठे करायचे, त्याला जोडरस्ते कसे तयार करायचे, अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. विविध खात्यांचा सहभाग त्यात लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती बापट यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे