पार्वतीने श्रीगणेशाची निर्मिती केली आहे. त्यामुळे गणपती सर्वार्थाने ‘ती’चाच आहे. महिलांनी स्वत:च आपल्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे. ती जोपर्यंत विचारांनी, निर्णयांनी स्वत: सक्षम होत नाही तोपर्यंत ‘ती’ला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्षच करावा लागणार आहे. ती’ला खरंतर कुणाकडे मागायची गरज नाही. ‘ती’ कोणताही आवाज न उठवता जर निमूटपणे सर्वकाही सहन करत बसली तर ‘ती’ला सर्वच गोष्टींपासून वंचितच राहावे लागेल. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’ चा गणपती हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ‘ती’ला खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त करून दिला आहे. महिलांनी घरातल्या लोकांना मान नक्कीच द्यावा, पण स्वत:ला हरवून देऊ नका, असे प्रसिद्ध उद्योजिका निवेदिता नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आपल्या सस्कृंतीमध्ये वर्षानुवर्षे ुपूजेचा मान हा पुरुषांनाच मिळत आला आहे. पूजेची तयारी, नैवेद्याचा स्वयंपाक आदी कामांमध्ये स्त्रियांचा ंसहभाग असतो. परंतु धार्मिक विधींचा अधिकार मात्र पिढीजात पद्धतीने पुरुषांनाच दिला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व विधी पुरुषच पार पाडत आले आहेत. महिलांचा सहभाग फार नगण्य राहिला आहे. पूजा-अर्चा, विधींपासून तिला डावलले जाते. परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काळाच्या ओघात बदलण्े गरजेचे आहे. पुण्यात एखादी प्रथा सुरू झाल्यावर तिला सर्वमान्यता मिळते. ‘लोकमत’ने ‘ती’चा गणपतीच्या माध्यमातून महिलांना सन्मान दिला आहे. आम्हीदेखील आमच्या फॅक्ट्रीमध्ये गणपती बसविण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली, तुम्ही पूजेची तयारी, नैवेद्य तयार करता, मग आरती तुमच्या हस्ते का होऊ शकत नाही? असे त्यांना सांगितले. आणि त्यांना ते पटले. आम्ही सर्व महिलांच्या हस्ते फॅक्ट्रीमध्ये आरती करीत आहोतच पण महिलांनीही त्यांच्या घरी आरती करण्यास सुरुवात केली हेच या विचाराचे यश आहे. हा उपक्रम इतका चांगला आहे की तो सर्वस्तरापर्यंत पोहोचला पाहिजे. एक महिला म्हणून माझ्याही मनात हा विचार कधी आला नव्हता. जो विचार लोकामतने जनमानसात रुजवून एक नवीन पायंडा पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.काही वर्षांमध्ये सार्वजनिक जीवनात महिलांचे स्थान दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हे स्थान निर्माण करण्यासाठी महिलांना कायमच झगडावे लागले आहे. खरंतर पार्वतीने म्हणजे एका महिलेचे श्रीगणेशाची निर्मिती केली आहे. हा गणपती सर्वार्थाने ‘ती’चाच आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:च आपल्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे. ती जोपर्यंत विचारांनी, निर्णयांनी स्वत: सक्षम होत नाही तोपर्यंत ‘ती’ला प्रत्येक गोष्टींसाठी संघर्षच करावा लागणार आहे. ‘ती’ला तो कुणाकडे मागायची गरज नाही. माझा अधिकार, माझा निर्णय, माझा गणपती, माझी पूजा हे स्वत:मध्ये अवलंबत नाहीत तोपर्यंत बदल हा घडणार नाही. ‘ती’ कोणताही आवाज न उठवता जर निमूटपणे सर्वकाही सहन करत बसली तर ‘ती’ला सर्वच गोष्टींपासून वंचित राहावे लागणार आहे. एक वर्ग अजूनही असा आहे, की त्यांच्यामध्ये हे विचार रुजलेले नाहीत, अजूनही काही घरांमध्ये महिलांना काही प्रमाणात दुय्यमतेची वागणूक दिली जाते. तुला व्यवहारातले काय कळते? असे म्हटले जाते. ही आजची पुरुषी मानसिकता आहे. पण याबरोबरच महिलादेखील अजूनही बुरसटलेल्या विचारांमध्ये जगत आहेत. घरातल्या गोष्टींना कर्तव्य म्हणून प्राधान्य देणे ठीक आहे, पण स्वत:मध्ये देखील अधिकारक्षमता निर्माण व्हायला पाहिजे. पुरुष सहजासहजी तुम्हाला कोणतेही अधिकार देणार नाहीत, ते आपल्यालाच घ्यावे लागणार आहेत. घरातल्या लोकांना मान द्या, पण स्वत:ला हरवून देऊ नका.आज समाजात दोन प्रवृतीचे लोक पाहायला मिळतात, एक जे संस्कृती मानत नाहीत, तर दुसरे रूढी, परंपरांमध्ये अडकून पडलेले असतात. त्याचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. काही गोष्टींना मुरडही घालता आली पाहिजे आणि काही गोष्टी कर्तव्य म्हणून समजता देखील आल्या पाहिजेत. तरच मागची आणि पुढची दोन्ही चाकं अगदी व्यवस्थित धावू शकतील. सध्याच्या परिस्थितीमध्ये काही लोकांना प्रथा- परंपरा जुन्या, पुरातन वाटत आहेत पण ते करण्यामागेदेखील नक्कीच एक शास्त्र आहे. त्याचे फायदेही आहेत. नव्या पिढीने हे सर्व झिडकारून त्याला मॉडर्न टच वगैरे द्यायचा म्हणून या गोष्टी टाळायला नाही पाहिजेत. उलट संस्कृतीमध्येही कालबाह्य पद्धतीने बदल व्हायला हवेत.
‘ती’ विचार आणि निर्णयांनी सक्षम व्हावी- निवेदिता नहार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 1:57 AM