उपसभापती शेलार यांनी जोगवडी, नसरापुर, किकवी, भोंगवाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन लसीकरण मोहिमेची माहिती आरोग्याधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्या वेळी ते बोलत होते. शेलार म्हणाले की, एक तारखेच्या आतच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा. त्यानंतर जर १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरु झाले तर त्या वेळी मोठी गर्दी होईल व वयोवृध्दांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आता गर्दी नसताना लसीकरण करून घ्यावे. दुसरा डोस घेणाऱ्यांचीही संख्या वाढणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायतीने पुढाकीर घेऊन गावातील ४५ वरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे.
यावेळी विठ्ठल धुमाळ, बबन आण्णा धुमाळ, पोलीस पाटील ऊर्मिला धुमाळ आदी उपस्थित होते.