भोर : भोर एज्युकेशन संस्थेत अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करण्यास टाळाटाळ करून चार वर्र्षांपासून फसवणूक करीत असल्याने संस्थेच्या व पदाधिका-यांच्या विरोधात सोमवारी (२८ आॅगस्ट) राजा रघुनाथराव विद्यालयाच्या गेटसमोर शीतल अंकुश मरळ उपोषणास बसणार आहेत. भोर तालुका संभाजी ब्रिग्रेडने त्यांना पाठिंबा दिला आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंकुश मरळ हे भोर एज्युकेशन संस्थेत लायब्ररीयन पदावर काम करत होते. त्याचे निधन १/६/२०१३ रोजी झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांची पत्नी शीतल मरळ यांना घेण्यात यावे. त्यासाठी त्यांनी लायब्ररीयनचा कोर्सही केला आहे. २७/७/२०१७ रोजी संभाजी ब्रिग्रेडच्या पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा होऊन १५ आॅगस्ट २०१७ पर्यत श्रीमती मरळ यांचा प्रस्ताव शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे पाठविण्याचे ठरले होते. मात्र संस्थेच्या पदाधिकाºयांनी १६/८/२०१७ रोजी संस्थेच्या बारे बसरापूर शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून नेमणुकीचे पत्र दिले. त्यानंतर संभाजी ब्रिग्रेडने पत्र देऊन चर्चा करण्याचे ठरले असतानाही संस्थेचे पदाधिकारी न सांगताच बाहेर गेले.निवेदनाच्या प्रती तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी (माध्यमिक पुणे) देण्यात आल्या आहेत.
नेमणूक नाही; आजपासून उपोषण, कुटुंबावर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:40 AM