पुणे: राज्यात गेल्या तीन - चार वर्षात राजकीय धक्के पाहायला मिळत आहेत. सत्ताबदलाने महाराष्ट्राची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस गटात प्रवेश करून अनेक धक्का दिला आहे. या घडामोडीनंतर अजितदादांवर विरोधकांकडून टीका होऊ लागल्या आहेत. त्यावरून अजित पवारांनीपुणे दौऱ्यावर असताना विरोधकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोक आमच्यावर टीका टिपण्णी करत आहेत. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. मात्र कामातून आम्हाला दाखवून द्यायचं आहे की, आमचा निर्णय किती चांगला होता. येत्या काळात हे दाखवून देऊ, असं अजित पवार म्हणाले आहेत.
पुण्यात हडपसर येथे अजित पवारांच्या हस्ते 106 फुटी ध्वजाचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आज पुण्यात अजितदादा विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे , फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मी कामाचा माणूस आहे. कामातून लोकांना उत्तर देणार आहे. उद्याचे भविष्य या तरुणांच्या हातात असल्याने त्यांना चांगलं घडवण्याचं काम करूया. महापालिका निवडणुका लागल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणुका लागल्या नाहीत. सध्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. ती सोडवण्यासाठीही उपायोजना करणं गरजेचं आहे
पुणे - पिंपरी चिंचवडला दर आठवड्याला बैठका
पुण्यात आता अजित पवारांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यावरून त्यांनी समस्या सोडवन्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पुण्यातील कामांबाबत बोलताना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना ठकाणवुन सांगितलं आहे. ते म्हणाले, अधिकाऱ्यांना सध्या कुणाला विचारण्याची गरज नसणार आहे. कामं झाली पाहिजेत. अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक कुणी चुका केल्या तर त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येईल. कुणाची गय केली जाणार नाही. राज्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. काम करताना जातीयसलोखा ठेवण्याचं काम करण्याबरोबरच अल्पसंख्याक समाजाला असुरक्षित वाटणार नाही काळजी घेणार असल्याचे पवार यांनी सांगितलं आहे.