शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

रुग्णालयांच्या नावात ‘धर्मादाय’ येईना ..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 4:27 PM

अनेक खासगी रुग्णालयांमधील चकचकीतपणामुळे रुग्णांना हे रुग्णालय धर्मादाय असल्याबाबत जाणीव नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात.

ठळक मुद्देकोल्हापुर व अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे २० आणि सातारा जिल्ह्यातील १५ रुग्णालयांचाही समावेश रुग्णालयांच्या बैठकीमध्ये सर्वांनी नावामध्ये धर्मादाय हा शब्द घालण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद

पुणे : धर्मादाय रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावण्याचे बंधन करण्यात आले असतानाही त्याकडे काही खासगी रुग्णालयांनी दुर्लक्ष केले आहे. अद्यापही अनेक रुग्णालयांनी या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही.     अनेक खासगी रुग्णालयांमधील चकचकीतपणामुळे रुग्णांना हे रुग्णालय धर्मादाय असल्याबाबत जाणीव नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात. संबंधित रुग्णालय धर्मादाय असल्याचे रुग्णांना लगेच कळावे, यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी काही दिवसांपुर्वी रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक केले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ५६ रुग्णालयांना हा निर्णय लागु होणार आहे. तसेच कोल्हापुर व अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी सुमारे २० आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ रुग्णालयांचाही यामध्ये समावेश आहे.काही रुग्णालयांनी निर्णयानंतर लगेचच नावापुढे धर्मादाय हा शब्द लावला आहे. तर काही रुग्णालयांच्या नावामध्ये आधीपासूनच हा शब्द आहे. याबाबत संबंधित रुग्णालयांनी धर्मादाय कार्यालयाला कळविले आहे. पण अद्यापही अनेक रुग्णालयांच्या नावामध्ये बदल झालेला दिसत नाही. या रुग्णालयांची नावे पूर्वीप्रमाणेच असून निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दरम्यान, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक भारत पक्षातर्फे गुरूवारी (दि. २०) दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय व रूबी हॉलसमोर आंदोलन करण्यात आले. लक्ष्मण चव्हाण, अमोल पवार, सागर शेडगे, अनिल करंजावणे, सोपान वांजळे, दत्ता तेरदाळे, विशाल गोडांबे, सदानंद तोंडे आदी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. इतर रुग्णालयांसमोरही आंदोलन केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.-------------रुग्णालयांच्या बैठकीमध्ये सर्वांनी नावामध्ये धर्मादाय हा शब्द घालण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बहुतेक रुग्णालयांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये नवीन नाव लावणे, अपेक्षित आहे. त्यानुसार बदल कले जात असून रुग्णालयांकडून याबाबत कळविण्यात येत आहे. - नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूरAhmednagarअहमदनगरSatara areaसातारा परिसर