पुणे : पुणे शहरात गुरुवारी ४ हजार ६७८ कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यापैैकी ४४८ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले, तर ८६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार २९ इतकी झाली आहे. सलग दुस-या दिवशी शहरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
शहरात सध्या ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, १४५ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैैकी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे प्रमाण १५.६४ टक्के इतके आहे. सध्या शहरात ४९४ व्हेंटिलेटर बेड, तर ३ हजार ९९५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. आजपर्यंत पुण्यात ४४ लाख ५१ हजार ७२७ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ५८ हजार ३२६ कोरोनाबाधितांचे निदान झाले. त्यापैैकी ६ लाख ४५ हजार ९६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९३३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.