शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

कलेला डिग्री लागत नाही : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 11:50 AM

झील इन्स्टिट्युट आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यावतीने आयाेजित व्यंगचित्र कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

पुणे : प्रत्येकाच्या अंगी कुठली ना कुठली कला असते. ती प्रत्येकाने जाेपासली पाहीजे, कारण कलेला कुठलिही डिग्री लागत नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष (मनसे) राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 'झील इन्स्टिट्युट' आणि 'कार्टुनिस्ट कंबाईन' यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याच्या 'इंक अलाइव्ह' या कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला ठाकरे उपस्थित हाेते. या कार्यशाळेचे उद्घाटन व्यंकचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. 

यावेळी मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला पालक हवे हाेते. आपल्या मुलांच्या अंगी असलेली कला पाहून त्यांना काय मार्गदर्शन करायला हवे हे त्यांना कळाले असते. राज्य सरकार चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकते, त्यामुळे अशा संस्था उभ्या राहणे आवश्यक असते. प्रत्येकाच्या अंगी जी कुठली कला असेल त्याने ती जाेपासली पाहीजे. कलेला डिग्री लागत नाही. मी जे. जे. स्कुल ऑफ आर्टसमध्ये शिक्षण घेतले. तिसऱ्या वर्षाला मी शिक्षण साेडले. मला राजकीय चित्रकार व्हायचे हाेते. मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या वडिलांकडून व्यंगचित्र शिकलाे. मला व्यंगचित्रकार हाेण्यासाठी कुठल्या डिग्रीची गरज लागली नाही.  आज पुण्यात केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे राज ठाकरे यांनी आवर्जुन सांगितले. व्यंगचित्राच्या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरुन आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्राचे प्रात्याक्षिक तुम्हाला पाहायला मिळाले हे तुमचं भाग्य असल्याचे राज ठाकरे उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेEducationशिक्षण