पुणे : होळीचा सण आज (दि.२४) मोठ्या उत्साहात पुणेकर साजरा करणार आहेत. परंतु, आज चंद्रग्रहण देखील आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम असू शकतो की, हा सण कसा साजरा करायचा किंवा करायचा की नाही, पण तसा चंद्रग्रहणाचा होळीवर काहीही परिणाम होणार नाही, त्यामुळे बिनधास्त होळी साजरी करावी, असे आवाहन पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
येत्या २४ मार्च २०२४ रोजी चंद्रग्रहण छायाकल्प असल्याने अशा ग्रहणाचे कोणतेही नियम पाळावयाचे नसतात. भारतात हे छाया कल्प चंद्र ग्रहण दिसणार नाही, तसेच भारताबाहेर काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे, त्याचे नियम पाळावयाचे नाहीत. २४ मार्च रोजी रविवारी होळी नेहमी प्रमाणे सूर्यास्त झाल्यावर प्रदोष काळात म्हणजे साधारण पणे रात्री ९ पर्यंत पेटवावी आणि होळीचा सण साजरा करावा, असे दाते यांनी सांगितले.