शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

सोलापूर रस्त्यांवरून पुण्यात येण्यास जड वाहनांना 'नो एंट्री' ? वाहतूक शाखेकडून प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 7:53 PM

वाहनांची वाढती गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन प्रस्ताव वाहतूक शाखेकडून सादर

ठळक मुद्देसकाळी ६ ते रात्री १० पर्यंत बंदी

पुणे : वाहनांची वाढती गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन शहरातील सोलापूर रोडसह ६ रस्त्यांवर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी घालण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेकडून सादर करण्यात आला आहे. त्यावर १६ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करुन त्यानंतर अंतिम आदेश काढण्यात येतील, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे. 

पुणे- सोलापूर रोडवरील रामटेकडी चौक ते गोळीबार मैदान चौक, पार्वती रोडवरील लुल्लानगर चौक ते खाणे मारुती चौक, प्रिन्स ऑफ व्हेल ड्राईव्ह रोडवरील लुल्लानगर चौक ते भैरोबानाला चौक, लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील भैरोबा नाला चौक ते घोरपडी जंक्शन, शिवरकर रोडवरील फातिमानगर चौक ते एबीसी फार्म चौक आणि संपूर्ण क्रिकेटपटू बापू सिधये मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे. सोलापूर रोडवरुन मार्केटयार्ड तसेच बांधकामासाठी लागणारे वाळूचे ट्रक, इतर साहित्य घेऊन येणारी जड वाहने शहरात येत असतात. त्यांना यापुढे पुण्यात येताना हडपसरच्या पुढे सोलापूर रोडचा वापर करता येणार नाही. त्यांना कात्रज, कोंढवा बाह्य रोडचा वापर करुन शहरात यावे लागेल. 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरhighwayमहामार्गHadapsarहडपसरtraffic policeवाहतूक पोलीस