पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया ही माेहीम सुरु करण्यात येणार अाहे. याच्या उद्घाटन समारंभात क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेण्यात येणार अाहे. त्यांच्या मुलाखतीतून विद्यार्थ्यांना व्यायामसाठी तसेच खेळासाठी प्राेत्साहन मिळू शकते परंतु या उद्घाटन साेहळ्याला विद्यार्थ्यांनाच प्रवेश नसल्याने सचिनच्या मुलाखतीतून नेमके काेणाला प्राेत्साहन मिळणार असा प्रश्न अाता उपस्थित केला जात अाहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अावारातील अायुकामधील चंद्रशेखर सभागृहात साेमवारी दुपारी 2 वाजता सचिन तेंडुलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम हाेणार अाहे. याबाबतची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. अरविंद शाळीग्राम यांनी शुक्रवारी अायाेजित पत्रकार परिषदेत दिली हाेती. तेंडुलकर यांची मुलाखत प्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले घेणार अाहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठाने निमंत्रित केलेले महाराष्ट्रातील सुमारे 250 शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष अाणि क्रीडा संचालक सहभागी हाेणार अाहेत. परंतु विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाहीये. त्यामुळे तेंडुलकरांच्या मुलाखतीतून नेमकी प्रेरणा मिळणार तरी काेणाला असा प्रश्न अाता विचारला जाताेय. याविषयी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डाॅ. दीपक माने यांना विचारले असता, या कार्यक्रमातून काही धाेरणात्मक निर्णय घेतले जाणार असल्याने हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथे येणारे विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष अाणि क्रीडा संचालक त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम व खेळाबद्दल जागृती करणार अाहेत. या कार्यक्रमात केवळ या माेहिमेची पाॅलिसी ठरविण्यात येणार असल्याने केवळ निमंत्रितांसाठीच हा कार्यक्रम ठेवण्यात अाला अाहे. सचिनची मुलाखत विविध महाविद्यालयांमध्ये फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून दाखविण्यात येणार अाहे, असेही माने म्हणाले. अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील एक तृतीयांश तरुण मुले-मुली काेणताही खेळ खेळत नाहीत किंवा व्यायामही करत नाहीत असे समाेर अाले अाहे. या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्यासाठी विद्यापीठाकडून या मिशन यंग अॅण्ड फीट इंडियाची सुरुवात केली जाणार अाहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर तसेच, मानसशास्त्र तज्ज्ञ डाॅ. मीनल साेहनी यांची मनाेगते हाेणार अाहेत. त्याचबराेबर शैक्षणिक अभ्यासक्रमात क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव कसा करता येईल यावर चर्चा देखील हाेणार अाहे. परंतु या माेहिमेच्या उद्घाटनाला विद्यार्थ्यांनाच प्रवेश नसल्याने ही माेहिम नेमकी अाहे तरी काेणासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
सचिनच्या मुलाखतीला तरुणांना नाे एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 7:10 PM