नाना पटोलेंना विद्यापीठात 'नो एन्ट्री'; विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठाने धुडकावली

By प्रशांत बिडवे | Published: May 8, 2023 05:09 PM2023-05-08T17:09:39+5:302023-05-08T17:11:02+5:30

आमची कोणी अडवणूक केल्यास अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार, विद्यार्थी संघटनांचा इशारा

No Entry to Nana Patole in pune university The rejected the request of the student unions | नाना पटोलेंना विद्यापीठात 'नो एन्ट्री'; विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठाने धुडकावली

नाना पटोलेंना विद्यापीठात 'नो एन्ट्री'; विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठाने धुडकावली

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी वसतीगृह, भोजनगृहाचा दर्जा, राष्ट्रीय शैक्षणीक धोरण आदी विषयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे येत्या १० मे रोजी  पुणे विद्यापीठात येऊन विद्यार्थी सोबत संवाद साधणार होते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून पाटोले यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. 

विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने नाना पाटोले यांच्या 'विद्यार्थी संवाद' या  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच या कार्यक्रमास परवानगी द्यावी आणि कॉमर्स हॉल मिळावा यासाठी दि.३ मे २०२३ रोजी लेखी पत्र कुलसचिवाना दिले होते. मात्र, त्यास ५ दिवस होऊनही अद्याप परवानगी दिली नाही. दरम्यान, पटोले यांच्या परवानगी न मिळाल्याने विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधीनी सोमवारी प्र. कुलगुरू यांची भेट घेतली. तेव्हा येत्या १० मे रोजी विद्यापीठात जी २० च्या आनुषंगाने कार्यक्रम असल्याने परवानगी मिळणार नाही असे तोंडी उत्तर आम्हाला दिले. याबाबत लेखी उत्तर मागितले असता तेही आम्हाला देण्यात आले नाही. असे विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी कुलदीप आंबेकर याने सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन परवानगी देत नसेल तरीही आम्ही नियोजित दिनी दि. १० मे रोजी कार्यक्रम घेण्यावर ठाम आहोत, यावेळी आमची कोणी अडवणूक केल्यास अथवा काही अनुचित प्रकार घडला तर त्यास विद्यापिठ प्रशासन जबाबदार असेल असेही आंबेकर म्हणाले. परवानगी संदर्भात विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने कुलगुरू कारभारी काळे यांच्या कार्यालयास पत्र देण्यात आले. यावेळी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांच्यासह नितीन आंधळे, नारायण चापके, गजानन अडबलवार, तुकाराम शिंदे, सागर अलकुंटे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. 

Web Title: No Entry to Nana Patole in pune university The rejected the request of the student unions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.