लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम नऊ वर्षांपासून रखडले आहे. मावळ परिसरातील शेतकºयांच्या विरोध आणि जलसंपदा खात्याचा निधी उपलब्ध नसल्याने हात आखडता घेतल्यामुळे धरण मजबुतीकरणाचे काम लांबणीवर पडले आहे. यासाठी महापालिकेतील भाजपाच्या सत्ताधाºयांना वेळ नाही. निधीअभावी मजबुतीकरण रखडले असून, धरण मजबुतीकरण झाल्यास दीड टीएमसी पाणीसाठा वाढणार आहे.शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या मजबुतीकरणाचे काम २००४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यासाठी पिंपरी महापालिकेने अर्थसाहाय्य केले. पाणीपट्टीतून ते वसूलही करण्यात आले. मात्र, २००८ मध्ये मावळातील शेतकºयांच्या आंदोलनानंतर हे काम थांबविले. मजबुतीकरणामध्ये अस्तरीकरण, डागडुजी, देखभाल दुरुस्ती, पाण्याची गळती रोखणे आदी कामांचा समावेश होता. पवना धरण १०.७८ टीएमसी क्षमतेचे आहे. यंदा धरणात ९.६८ टीएमसी पाणी अडविण्यात आले आहे. धरण मजबुतीकरणाचेकाम झाल्यास १.४८ टीएमसी साठा क्षमता वाढेल, अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.महापालिकेकडे पवना धरणासाठी निधी उपलब्ध नसता, पवना धरणातील गाळ काढण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकास निधीचा उपयोग केला. सलग दोन वर्षांत ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे सात कोटी ६० लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. पवना धरणातील गाळ गेल्या ४५ वर्षांत काढला गेला नाही. गाळ काढण्याकडे जलसंपदा विभागाने आणि राष्टÑवादी काँग्रेसनंतर महापालिकेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही दुर्लक्ष केले. एकूण ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यानंतर यंदादेखील उन्हाळ्यात त्यांनी धरणातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे यंदा ३६ हजारक्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. यामुळे धरणाची साठवण क्षमता सात कोटी लाख लिटरने वाढली आहे. याबाबत महापालिकेलाही त्यांनी निधी संदर्भात आवाहन केले होते. मात्र, गाळ काढण्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, याची दक्षता भाजपाने घेतली आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे पवना नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी नदीतून पाणीपुरवठा करण्याऐवजी थेट धरणातून पाणी उचलणे आरोग्यास फायदेशीर ठरेल. त्या दृष्टीने भविष्यात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राबविणे उपयुक्त ठरणार आहे.>धरणासाठी महापालिकेने निधी द्यावापिंपरी-चिंचवडला सर्वाधिक पाणीपुरवठा पवना धरणातून केला जातो. बंदिस्त जलवाहिनीस भाजपाने खोडा घातला आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे नेते पवनेच्या मजबुतीकरणास निधी देत नाहीत. त्यामुळे २४ तास पाणी कागदावरच राहणार आहे. पवना मजबुतीकरणासाठी महापालिकेने निधी द्यावा, अशी मागणी होत आहे....तर शंभर एमएलडी पाणी वाचणारमहापालिकेची महत्त्वाकांक्षी २४ तास पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. या योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी पाणीपुरवठा विभाग या योजनेच्या तयारीत गुंतला आहे. त्या अनुषंगाने घरटी पाहणी, पाणीपुरवठ्याची गरज तपासणे, जुने नळजोड आणि पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्यांच्या तपासणीचे काम ४० टक्के पूर्णत्वास गेले आहे. २७ तास पाणीपुरवठा योजनेसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, ही योजना यशस्वी झाल्यास शहरात दररोज ८० ते १०० एमएलडी पाणी वाचेल, असा विश्वास महापालिकेला आहे.येळसे-पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणाच्या परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरले आहे. धरणाची क्षमता ८.५१ टीएमसी आहे.रविवारी पहाटे सहाला धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा ८.५१२ टीएमसी इतका झाला आहे. १ जूनपासून १३ आॅगस्टअखेर एकूण पाऊस २४३७ मिमी झाला आहे. गतवर्षी या कालावधीत १९०८ मिमी पाऊस झाला होता. धरणाच पाणीसाठा १०० टक्के होता.
पवना धरणासाठी महापालिकेकडे नाही निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:59 PM