वाघोली (पुणे) : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रोडिजी पब्लिक स्कूल मधील कार्यालयात मनसेने तोडफोड केली. १० वी च्या काही मुलांचे शुल्क बाकी असल्याने बोर्डाच्या परीक्षाचे हॉल तिकीट दिले नव्हते. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेऊन अगोदर फी भरा मगच हॉल तिकीट देऊ, असा आदेश शाळेच्या वतीने काढण्यात आला होता. त्यानंतर मनसेने तिथे तोडफोड केली. हा प्रकार वाघोलीतील जेएसपीएम शाळेत घडला.
गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या मनमानी कारभाराला पालक वैतागले होते. या कारभाराच्या विरुद्ध पालकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलल्यानंतर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेची अरेरावी व मनमानी कारभाराला वैतागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.