पुणे - अकरावी प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान, कला व वाणिज्य शाखानिहाय किती जागा उपलब्ध आहेत, याची माहितीच अद्याप शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात झाली असातनाही ही माहिती उपलब्ध नसल्याने पालकांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. यापार्श्वभूमीवर अपुऱ्या माहितीवर मार्गदर्शनवर्ग घेण्यात आल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. अकरावी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बुधवारी शहरात विभागनिहाय ७ ठिकाणी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. गरवारे कॉलेज, कलमाडी हायस्कूल (एरंडवणे), पटर्वधन विद्यालय (दांडेकर पूल), आझम कॅम्पस (कॅम्प), साधना विद्यालय (हडपसर), मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर), म्हाळसाकांत महाविद्यालय (आकुर्डी) येथे हे वर्ग पार पडले. अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग एक आतापर्यंत ७५ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी भरला आहे. त्यापैकी १६ हजार ५६२ अर्जांची अद्याप पडताळणी झालेली नाही. प्रवेश अर्जाच्या दुसºया भागात आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण व त्यांना प्रवेश हवा असलेल्या महाविद्यालयांचा मागील वर्षीचा कटआॅफ पाहून पसंतीक्रम भरावा. महाविद्यालयांचा अंतर्गत कोटा (२० टक्के), व्यवस्थापन कोटा (५ टक्के) जागा राखीव असणार आहेत. अकरावी प्रवेशप्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी महाविद्यालयांचा २० टक्क्यांचा अंतर्गत कोटा भरला जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी एकूण ४ फेºया राबविल्या जाणार आहेत. या फेºया पूर्ण झाल्यानंतर दहावीच्या जुलै-आॅगस्टच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेºया समितीकडून राबविल्या जाणार आहेत.विद्यार्थ्यांनी, पालकांनी याची माहिती करून घ्यावीविद्यार्थ्यांना अकरावीसाठी जे विषय हवे आहेत, ते पसंतीक्रम लिहीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिकवले जातात ना, याची माहिती करून घ्यावी.महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकण्यापूर्वी तिथले शुल्क किती आहे, याची माहिती घ्यावी. एकाच महाविद्यालयातील अनुदानित व विनाअनुदानित तुक ड्यांच्या फीमधील फरक समजून घ्यावा.पसंतीक्रमांक एकचे महाविद्यालय काळजीपूर्वक टाकावे. पसंतीक्रमांक एक टाकलेले महाविद्यालय विद्यार्थ्यांना मिळाल्यास तिथेच त्यांना प्रवेश घ्यावा लागेल.शिक्षण उपसंचालक पद रिक्तअकरावी प्रवेशप्रक्रियेचे काम शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पार पाडले जाते. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व महाविद्यालयांची एकत्रित प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जात असल्याने त्याचा मोठा भार शिक्षण उपसंचालकांवर असतो. मात्र, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांची नुकतीच बदली झाली आहे, त्याचवेळी उपसंचालकपदी इतर अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना शिक्षण उपसंचालक पद रिक्त राहिले आहे.त्या विद्यार्थ्यांना मिळेना माहितीपुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत अकरावी प्रवेशाचे आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. मात्र, जिल्ह्यातील, तसेच दुसºया शहरांमधील विद्यार्थ्यांनी कुठे जाऊन अर्ज भरायचे आहेत, याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. संकेतस्थळावरदेखील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या पालक व विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.