कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही : अजित पवारांचा सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 10:30 AM2021-01-25T10:30:00+5:302021-01-25T10:30:03+5:30

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही.

No matter how big a father he is, he will not give up: Ajit Pawar | कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही : अजित पवारांचा सज्जड दम

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही : अजित पवारांचा सज्जड दम

Next

बारामती : खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर तडीपार, मोका सारखी कारवाई करेन.  कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी सावकारांना भरला.

बारामती येथील जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबाह्य व कायदे मोडून व्यावसाय करण्यापेक्षा चांगले व्यावसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा. दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर कोणी सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करात येईल  तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत अला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला. तत्पूर्वी बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांना सेवापूर्तीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. 

तसेच बहुळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बहुळकर म्हणाले, बारामती सहकारी बँकेमध्ये मागील ४१ वर्षांपासून लिपिक पदापासून काम केले. बँकेचे संचालक मंडळ, खातेदार यांच्या प्रेमामुळे आपण इतकी वर्षे कार्यरत राहिलो. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती बँकेचे चेअरमन श्रीकांत सिकची, व्हाईस चेअरमन अविनाश लगड, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व बँकेचे खातेदार उपस्थित होते. 

बारामती शहर व तालुक्यात अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये कालवा सुशोभिकरण, शिवसृष्टी, चिंकारा पार्क, रस्ते, पुल, तिन हत्ता चौक सुशोभिकरण यामुळे बारामती शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. यामध्ये कोणाची जागा जात असेल तर त्याला विरोध करू नका. अतिक्रमण केले असेल तर नियमाप्रमाणे ते काढण्यात येईल. शहराचा कायापालट होत असताना आपल्या काही कल्पना असतील तर नक्की आम्हाला कळवा. चांगल्या कल्पानांवर काम करता येईल. पालखी मार्गाच्या भूसंपादनासाठी ३५० कोटी रूपये मंजुर झाले आहेत. लवकरच हे काम होणार आहे. तसेच शहरातील बसस्थानकाची इमारत देखील नव्याने उभी करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या पाच बसस्थानकामध्ये बारामतीचे बसस्थानक असेल यापद्धतीने काम केले जाणार आहे. मात्र ही विकासकामे होत असताना समाजातील कोणताही घटक त्यापसून वंचीत राहणार नाही, याची देखील काळजी घेण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार १०० रूपये  साखरेचा दर झाला आहे. मात्र सध्या साखर विकली जात नाही. आरबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार सहकार क्षेत्रासमोर वेगवेगळ्या अडचणी निर्माण करीत आहे. सहकारावर बंधने आणली जात आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत पवार साहेबांसोहत चर्चा झाली आहे. यामधून मार्ग काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे दिवस उगवल्यापासून त्यांच्या कामाचा झपाटा सुरू असतो. पवार यांच्या मनात आले तर अगदी सकाळी सहा वाजता एखाद्या विकासकामाची पहाणी करण्यासाठी ते पोहचतात. त्यामुळे सहाजिकच सबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहाटेपासून सबंधीत कामाच्या ठिकाणी थांबावे लागते. हाच धागा पडकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ माझ्यामुळे अनेकांना सकाळी लवकर उठावे लागते. अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी देखील कामाच्या ठिकणी पोहचावे लागते. या अधिकाऱ्यांच्या बायका म्हणत असतील कुठून बारामतीत नोकरीला आलो’ अशा शब्दात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिमटा काढला. यावर सभागृहात देखील हशा पिकला. 
------------------------------------

Web Title: No matter how big a father he is, he will not give up: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.