शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही : अजित पवारांचा सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 10:30 AM

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही.

बारामती : खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर तडीपार, मोका सारखी कारवाई करेन.  कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी सावकारांना भरला.

बारामती येथील जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबाह्य व कायदे मोडून व्यावसाय करण्यापेक्षा चांगले व्यावसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा. दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर कोणी सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करात येईल  तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत अला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला. तत्पूर्वी बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांना सेवापूर्तीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. 

तसेच बहुळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बहुळकर म्हणाले, बारामती सहकारी बँकेमध्ये मागील ४१ वर्षांपासून लिपिक पदापासून काम केले. बँकेचे संचालक मंडळ, खातेदार यांच्या प्रेमामुळे आपण इतकी वर्षे कार्यरत राहिलो. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती बँकेचे चेअरमन श्रीकांत सिकची, व्हाईस चेअरमन अविनाश लगड, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व बँकेचे खातेदार उपस्थित होते. 

बारामती शहर व तालुक्यात अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये कालवा सुशोभिकरण, शिवसृष्टी, चिंकारा पार्क, रस्ते, पुल, तिन हत्ता चौक सुशोभिकरण यामुळे बारामती शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. यामध्ये कोणाची जागा जात असेल तर त्याला विरोध करू नका. अतिक्रमण केले असेल तर नियमाप्रमाणे ते काढण्यात येईल. शहराचा कायापालट होत असताना आपल्या काही कल्पना असतील तर नक्की आम्हाला कळवा. चांगल्या कल्पानांवर काम करता येईल. पालखी मार्गाच्या भूसंपादनासाठी ३५० कोटी रूपये मंजुर झाले आहेत. लवकरच हे काम होणार आहे. तसेच शहरातील बसस्थानकाची इमारत देखील नव्याने उभी करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या पाच बसस्थानकामध्ये बारामतीचे बसस्थानक असेल यापद्धतीने काम केले जाणार आहे. मात्र ही विकासकामे होत असताना समाजातील कोणताही घटक त्यापसून वंचीत राहणार नाही, याची देखील काळजी घेण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार १०० रूपये  साखरेचा दर झाला आहे. मात्र सध्या साखर विकली जात नाही. आरबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार सहकार क्षेत्रासमोर वेगवेगळ्या अडचणी निर्माण करीत आहे. सहकारावर बंधने आणली जात आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत पवार साहेबांसोहत चर्चा झाली आहे. यामधून मार्ग काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे दिवस उगवल्यापासून त्यांच्या कामाचा झपाटा सुरू असतो. पवार यांच्या मनात आले तर अगदी सकाळी सहा वाजता एखाद्या विकासकामाची पहाणी करण्यासाठी ते पोहचतात. त्यामुळे सहाजिकच सबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहाटेपासून सबंधीत कामाच्या ठिकाणी थांबावे लागते. हाच धागा पडकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ माझ्यामुळे अनेकांना सकाळी लवकर उठावे लागते. अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी देखील कामाच्या ठिकणी पोहचावे लागते. या अधिकाऱ्यांच्या बायका म्हणत असतील कुठून बारामतीत नोकरीला आलो’ अशा शब्दात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिमटा काढला. यावर सभागृहात देखील हशा पिकला. ------------------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारी