पुणे: डिलिव्हरी बॉयच्या प्रति पार्सलमागे दर वाढवणे, प्रत्येकाला इन्शुरन्स क्लेम मिळावा, प्रत्येकाला केवायसी अनिवार्य करू नये, अशा विविध मागण्यांसाठी अँमेझॉन डिलिव्हरी बॉईजने पुणे शहरात संप पुकारला आहे. त्यामुळे शहरातील अँमेझॉन कार्यालयात अनेक वस्तूंचा साठा पडून आहे. कंपनीने कितीही दबाव आणला तरी आम्ही संप मागे घेणार नाही. असा इशारा डिलिव्हरी बॉयने कंपनीला दिला आहे.
अँमेझॉन ही जगातील ऑनलाइन डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध कंपनी मानली जाते. देशातही असंख्य नागरिक अँमेझॉनवरून वस्तू घेण्याला प्राधान्य देतात. कोरोना काळात तर यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली होती. अजूनही वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने काही डिलिव्हरी बॉइसची मते जाणून घेतली.
शहरात अँमेझॉन या कंपनीसाठी काम करणारे १ हजार ते दीड हजार डिलिव्हरी बॉय आहेत. प्रत्येक जण ८ ते १० तास काम करतो. तर ८० ते १०० च्या आसपास डिलिव्हरी करतो. त्यांना सकाळी ७ वाजल्यापासून कामाला सुरुवात करावी लागते. वेळेत डिलिव्हरी पूर्ण झाली नाही. तर अजून काही वेळ वाढवून काम करावे लागते. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण लोकांच्या दारावर जाऊन डिलिव्हरी द्यावी लागत असे. नाहीतर नागरिक कंपनीकडे तक्रार करत होते. तसेच पत्ते सापडण्यासही खूप अडचणी येतात. मग डिलिव्हरी वेळेवर होत नाही. तरीही आम्ही कामे पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही. असेही त्यांनी सांगितले. तरीही कोणत्याही डिलिव्हरी बॉयने काम सोडण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक जण १०० टक्के चांगले काम करत होते. नवीन डिलिव्हरी बॉयला महिना १० हजार रुपये वेतन मिळत आहे. त्यामध्येही कंपनी अटी लागू करून आमच्यावर दबाव आणत आहे. कंपनीने मध्यंतरी प्रति पार्सल मागे दर कमी केले होते. ते वाढवण्याची आम्ही मागणी करत आहोत.
कंपनीकडून डिलिव्हरी बॉईजला धमकी कंपनीच्या कार्यालयात वस्तूंचा साठा वाढत चालला आहे. शहरात लाखांच्या घरात वस्तू कार्यालयात पडून आहेत. " तुम्ही कामावर आले नाहीत, तर कामावरून काढण्यात येईल " अशी धमकी कंपनीच्या मॅनेजर आणि सुपरवायजर कडून दिली जात आहे.
मागण्या - व्हॅन ३५ रुपये प्रति पार्सल करावे- छोटे पार्सल २० रुपये प्रति पार्सल करावे - आय एच एस २५ रुपये प्रति पार्सल करावे - एक दुचाकी व्यक्तीला २० रुपये प्रत्येकी द्यावेत - व्हॅन साठी ७०,८० रुपये द्यावेत - २० ते २५ पाकीटला ४८० रुपये द्यावेत. - प्रत्येकाला केवायसी आग्रह नको - प्रत्येकाला इन्शुरन्स क्लेम पाहिजे.