शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

शहरात पाणी कपात करण्याची गरजच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:46 PM

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी व पुणेकर मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाने पुणेकरांच्या हक्काचे पाणी देण्यास नकार दिला.

ठळक मुद्देबेबी कॅनोलमधून शेतीसाठी ५५० एमएलडी पाणी घेणे शक्य असताना उचल केवळ ३७० एमएलडीचीचदिवाळीनंतर प्रतिदिन केवळ ११५० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल असे स्पष्ट महापालिकेने १०० कोटी रुपये खर्च करून मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची केली उभारणी खडकवासला प्रकल्पातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस

पुणे: पुणेकरांच्या कराच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून बेबी कॅनोलद्वारे शेतीसाठी दररोज ५५० एमएलडी पाणी सोडणे शक्य असताना पाटबंधारे विभागाकडून केवळ ३७० एमएलडी पाणी उचलले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतीच्या नावाखाली पुणे शहराच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यात कपात करण्याचा डाव पाटबंधारे विभागाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी व पुणेकर मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाने पुणेकरांच्या हक्काचे पाणी देण्यास नकार दिला. यामुळे दिवाळीनंतर पुणे शहरात पाणी कपात होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु शेतीसाठी पुणेकरांच्या कराच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून बेबी कॅनोलमधून शेतीसाठी दररोज किमान ५५० एमएलडी पाणी उचलने श्क्य असताना पाटबंधारे विभागाकडून केवळ ३७० एमएलडी पाणी उचलले जात असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या संपूर्ण शहराला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १३५० एमएलडी पाण्याची गरज असते. परंतु पुणेकर मंजुर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने दिवाळीनंतर प्रतिदिन केवळ ११५० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल असे स्पष्ट केले. यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात दररोज सुमारे २०० एमएलडी पाणी कपात करण्यात येणार आहे. परंतु, शेतीसाठी पुणेशहराच्या पाणी पुरवठ्यात कपात न करता देखील शेतीसाठी बेबी कॅनोलमधून २०० एमएलडी पाणी घेणे शक्य आहे.         शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांतून संचिनासाठी दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. शेतीसाठी  शेतीसाठी प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने १०० कोटी रुपये खर्च करून मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पातून ६.५ टीएमसी पाणी सिंचनासाठी महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दररोज ५५० एमएलटी पाणी जलसंपदा विभागाला सिंचनासाठी उचलता येणे शक्य आहे. मुठा उजला कालवा फुटीनंतर गेल्या तीन आठवड्यापासून कालव्यातून एक थेंब देखील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले नाही. या तीन आठावड्यात बेबी कॅनोलमधून शेतीसाठी दररोज किमान ५५० एमएलडी पाणी उचलने शक्य होते. परंतु शेतीसाठी अत्यंत गरज असल्याने तातडीने कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात असताना बेबी कॅनोलमधून दररोज केवळ ३७० एमएलडीच पाणी उचलण्यात आले आहे. प्रकल्पपूर्ण झाल्यानंतर अद्याप एकदाही पूर्ण साडे सहा टीएमसी पाणी जलसंपदा विभागाकडून उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीसाठी प्रकल्पातून पाणी घेणे शक्यत असताना शेतीच्या नावाखाली धरणातूनच पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे.-------------पुणेकरांची पाणी कपात करण्याची गरजच नाहीयंदा शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. परंतु याच कालवधीत पाटबंधारे विभागाने भविष्याचे कोणतेही योग्य नियोजन न करता व गरज नसताना मोठ्या प्रमाणात नदी आणि कॅनोलमधून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आली. तसेच मुठा कालवा फुटल्यानंतर गेल्या तीन आठवड्यापासून प्रक्रिया केलेले दररोज ५५० एमएलडी पाणी बेबी कॅनोलद्वारे शेतीसाठी देणे शक्य असताना पूर्ण क्षमतेचा वापर पाटबंधारे विभाग करत नाही. त्यामुळे शेतीच्या नावाखाली दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील साखर कारखान्यांना धरणातील पिण्याचे पाणी सोडण्याचा डाव पाटबंधारे विभागाचा आहे. परंतु आता पुणे शहराची पाणी कपात करण्याची गरजच नसून, शेतीसाठी पाणी पाहिजेच असेल तर बेबी कॅनोलमधून प्रक्रिया केलेले पाणी घ्या.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचाचे प्रमुख--------------शहराची दररोज पाण्याची गरज - १३५० एमएलडीदिवाळीनंतर मिळणारे पाणी - ११५० एमएलडीदररोज होणारी पाणी कपात-२०० एमएलडी-----------------शेतीसाठी बेबी कॅनोलमधून दररोज होणार पाणी पुरवठा - ५५० एमएलडीपाटबंधारे विभागाकडून दररोज शेतीसाठी उचलले जाणारे पाणी-३७० एमएलडीक्षमता असून दररोज वाय जाणारे पाणी - २०० एमएलडी

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDamधरण