पुणे : शहरामध्ये आगामी अंदाजपत्रकामध्ये (२०१६-१७) नवीन उड्डाणपुलासाठी निधी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या वर्षात शहरात एकाही नवीन उड्डाणपूल उभारणी होणार नाही. शहरात उड्डाणपुलांचे जाळे उभे करण्याऐवजी वाहनांची संख्या कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच पादचारी आणि सायकलस्वारांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे.रस्त्यावरून वाहनांना वेगाने जाता यावे, वाहतूककोंडी होऊ नये याकरिता शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये रस्त्यांवर उडडणपूल उभारण्याचे मोठमोठे प्रकल्प गेल्या काही वर्षांत पूर्ण करण्यात आले. वाहतूक वाढली की लगेच उडडण पूल उभारण्याची मागणी पुढे येत होती. स्वारगेट, गणेशखिंड रोड, सिंहगड रोड, हडपसर, संचेती चौक अशा अनेक ठिकाणी मोठे उडडणपूल उभारण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षी या उडडण पुलांच्या उभारणीसाठी अंदाजपत्रकामध्ये भरीव तरतूद केली जात होती. मात्र, २०१६-१७ च्या अंदाजपत्रकामध्ये कुणाल कुमार यांनी सरसकट उडडणपूल उभारण्याच्या संकल्पनेला फाटा दिला आहे.डेंगळे पुलाला पर्यायी पुलासाठी तुटपुंजी तरतूदडेंगळे पूल हा धोकादायक बनल्याने या पुलाला पर्यायी समांतर पूल उभारण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. सध्या या पुलावरील जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या पुलाला पर्यायी पूल बांधण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये केवळ ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या कामासाठी मोठा खर्च येणार असल्याने पुढील वर्षी या पुलाचे काम करता येणार नाही.कितीही पूल कमीच पडतीलउड्डाणपुलांविषयी भूमिका स्पष्ट करताना आयुक्त कुमार यांनी सांगितले, की शहरामध्ये रस्ते कितीही मोठे केले, उडडणपूल उभारले, तरी काही काळानंतर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ते कमीच पडत आहेत. त्यामुळे उडडणपूल उभारणे हा पर्याय होऊ शकत नाही, वाहनांची संख्या कमी करणे आवश्यक आहे. वाहनांसाठी जितक्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील तितकी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परदेशामध्येही बांधलेली उड्डाणपुले पाडण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर शहरात नवीन उडडणपुलांची उभारणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.सार्वजनिक वाहतूक धोरणवाहतूक नियोजन, प्रकल्प यासाठी आगामी अंदाजपत्रकामध्ये कुणाल कुमार यांनी ३२५ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद केली आहे. प्रामुख्याने जुन्या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कुणाल कुमार यांनी नुकतेच सार्वजनिक वाहतूक धोरण जाहीर केले आहे. आगामी वर्षात शहरात ७५ किलोमीटर पदपथ, ३० किमी बीआरटी मार्ग बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्वारगेट चौक, वारजे येथील युनिव्हर्सल चौक येथील उड्डाणपुलांचे काम अग्रक्रमाने पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंढवा येथे रेल्वेलाईनवर ओलांडणी पूल बांधला जाणार आहे.
एकाही नवीन उड्डाणपुलाची उभारणी नाही
By admin | Published: January 28, 2016 3:14 AM