विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 03:45 PM2023-08-07T15:45:23+5:302023-08-07T16:11:58+5:30

जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पवार बोलत होते...

No one will be left behind during development; Ajit Pawar's Testimony in 'Shasan Apya Dari' Program | विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही

विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही

googlenewsNext

पुणे : गेली ९ वर्षे देश प्रगतीपथावरून जात आहे. राज्यातही विकास करण्यासाठी महायुतीचे सरकार काम करत आहे. पुणे जिल्ह्यात विमानतळ उभे करण्यासाठी जमीन महत्त्वाची आहे. यासाठी योग्य मोबदला देणे गरजेचे आहे. सध्याचे सरकार विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे. राज्यातील बसस्थानके स्वच्छ आणि चांगली होतील यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात कुठलाही विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सर्व कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. यापूर्वी चंद्रकांत पाटील काम करत होते. आता मी आणि दिलीप वळसे पाटील आणि चंद्रकांत पाटील मिळून काम करणार आहोत.

जे कंत्राटदार चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. पण जे कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे सरकार पहिले दोन इंजिनच होते, आता त्यात आमचं एक इंजिन जोडलं गेल्याने हे तीन इंजिनच सरकार उत्तम काम करेल, असंही पवार म्हणाले.

Web Title: No one will be left behind during development; Ajit Pawar's Testimony in 'Shasan Apya Dari' Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.