पुणे : बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे शंभरपेक्षा जास्त बालके दगावली. त्यामागे अस्वच्छतेतून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसार, लिची फळाचा आहारात अनुचित समावेश, उष्माघात ही कारणे त्यामागे आहेत. या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसींबाबत जागरूकता न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. विषाणूंमुळे पसरणारा हा आजार असला तरी पुण्याला मात्र या आजाराचा धोका नाही, असे स्पष्टीकरण बालरोगतज्ञांनी दिले आहे.मेंदूज्वरामुळे बालके दगावल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. बिहारमधून कामानिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या आजाराची साथ पुण्यात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भाने बिहारमधल्या आजाराचा संसर्ग पुण्याला धोका नसल्याचा निर्वाळा बालरोगतज्ञांनी ‘लोकमत’कडे व्यक्त दिला.डॉ. जयंत नवरंगे म्हणाले, पुण्यात मेंदूज्वराच्या एक-दोन केसेस असू शकतात. पण त्या साथीच्या आजारामुळे नाहीत. मुळात मेंदूज्वराचे दोन प्रकार आहेत. एक अतिउष्णता म्हणजे उष्णतेच्या लाटेमुळे मेंदूज्वर (ब्रेन फिव्हर) झालेला आहे. यात मेंदूच्या पेशींना सूज येते. याचबरोबर लिचीच्या फळानेही देखील हे होऊ शकते. कुपोषित मुलांनी जर ही फळे खाल्ली तर रक्तातील साखर कमी होते. अस्वस्थ वाटणे, ताप येणे, उलट्या होणे, चक्कर येणे, झटके येणे आणि भान हरपून कोमामध्ये जाणे ही त्याची लक्षणे आहेत. तुरळक प्रमाणात साथीचे आजार चालूच असतात. पण साथीच्या आजाराच्या स्वरूपात जेव्हा हे चालत येते तेव्हा त्याचे मूळ कारण शोधावे लागते. गोरखपूरला असाच साथीचा आजार बळावला होता. जॅपनीज बी नावाचा जपानी व्हायरस असतो. तो पुणे जिल्ह्याला होण्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र त्याची लस उपलब्ध आहे. एक ते दहा वर्षाच्या मुलांनी ही लस टोचून घ्यावी. डॉ. दिलीप सारडा यांनी बिहारमधील मेंदूज्वर अस्वच्छता, त्यातून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसारामुळे उदभवलेला असू शकतो. याची लसही उपलब्ध आहे; मात्र त्याविषयीच्या जागरूकतेच्या अभावामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे सांगितले.
बिहारमधल्या मेंदूज्वराचा धोका पुण्याला नाही : बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 12:07 PM
बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे शंभरपेक्षा जास्त बालके दगावली.
ठळक मुद्देघाबरण्याचे कारण नाहीबिहारमधील मेंदूज्वर अस्वच्छता, त्यातून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसारामुळे अस्वस्थ वाटणे, ताप येणे, उलट्या होणे, चक्कर येणे, झटके येणे यांसारखी त्याची लक्षणे बिहारमधून कामानिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी