जयवंत गंधाले - लोकमत न्यूज नेटवर्कफुरसुंगी : कचरा डेपोच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर फुरसुंगी गाव पालिकेत घेण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत पालिकेपेक्षा बरी होती, अशी वेळ येथील नागरिकांवर आली आहे. पुणे महापालिकेला या वाढलेला परिसराच्या विकासकामाची जबाबदारी पेलवत नाही, असे गेल्या वर्षातील कामातून दिसून आले आहे. अनेक प्रश्न रखडलेले आहे. ते कसे आणि कधी होणार हा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. सुमारे ७८ कोटी पाणी योजनेचे टाकीचे काम चालू आहे. पाईपलाईन टाकायचे काम चालू आहे. फुरसुंगी गावच्या प्रमुख रस्त्याचे महापालिकेने कोणतेही काम केले नाही. सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. गाव पालिकेत समाविष्ट झाले तरीही हे काम केले जात आहे. पालिकेत समाविष्ट होऊनसुद्धा पिण्याचे पाणी मिळत नाही, पालिकेच्या आरोग्याच्या कोणत्याही सुविधा गावात नाहीत, मनपाचे शाळा नाही. बांधकामाच्या नोंदी अजून चालू झाल्या नाहीत. फक्त कर घेण्याचे काम चालू आहे. कोणत्याही सुविधा न देता म्हणजेच अग्निशामक कर, वृक्षसंवर्धन कर, जललाभ कर, जलनि:सारण लाभ कर, पथकर, मनपा शिक्षण उपकर, शिक्षण कर ( निवासी ) या प्रकारचे कर घेतले जातात. फुरसुंगी गावच्या विकासाबाबत अजून नियोजन नाही. पालिकेत गाव गेल्यापासून ११० मीटरच्या रिंगरोडचे नियोजन रखडले आहे. ग्रामपंचायत असतानाही सुरू झालेली आणि मनपा आल्यावर बंद पडून असलेली अर्धवट विविध विकासकामे अजून तशीच आहेत. ती बंद आहेत. त्यावर पुढे काहीही झाले नाही. कचरा डेपो बाधित वारसांमध्ये ५७ लोकांपैकी २९ लोकांचे काम झाले आहे. अजून २८ लोक त्यापासून वंचित आहेत. ग्रामपंचायत असताना कॉन्ट्रक्ट बेसवर भरलेल्या कामगारांना अजून त्यांना पालिकेत समाविष्ट करून घेतले नाही. ग्रामपंचायतीमधील कायमस्वरूपावर असलेल्या कर्मचाºयांना ग्रामपंचायतीच्या नियमानुसार पगार मिळत आहे. पालिकेच्या नियमानुसार मिळत नाही. नवीन बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवाने मिळत नाहीत. मनपाचे दवाखाने, हॉस्पिटल सुविधा नाहीत, अंतर्गत रस्ते नाहीत, नवीन ड्रेनेज सुविधा नाहीत, आठवडे बाजार सुविधा नाहीत, विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक सुविधा, महिलांसाठी योजना, अपंग, विकलांगसाठी योजना नाहीत, ओढे, नाले यांची दुरवस्था आहे. .......डांबरीकरणाची मागणी* गावठाणातील वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी , हडपसरला जाणारा पर्यायी रस्ता करण्यासाठी दोनही कॅनॉलवर डांबरीकरणाची अशी मागणी विशाल हरपले यांनी केली आहे. * अंत्यविधी आणि फुरसुंग दशक्रिया विधीच्या दुरावस्था जागा पुरत नाहीत. पत्रा शेड गळके आहे. लाईट नाहीत,पार्कींगची व्यवस्था नाहीत, जागा अपूरी पडत आहेत. अंत्यविधी आणि दशक्रिया विधी या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नाही त्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संजय हरपले यांनी केली आहे..........दररोज शंभर टक्के टँकरची आवश्यकता आहे. मात्र पालिका ८0 ते ८५ टँकर देत आहे. संख्या वाढवून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर उरुळी व फुरसुंगी ही दोन गावे टँकरमुक्त कशी होतील, यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. - गणेश ढोरे, नगरसेवक, पुणे मनपा
सध्या दररोज फुरसुंगीसाठी ८० ते ९० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फुरसुंगीचे पाणी पूर्णत: हा कालवा व कालव्याशेजारील विहिरीवर अवलूंबून आहे. ३३ एमएलडी प्लांट बांधण्यात येत आहे. सदर प्लांट कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- गौतम गावंड, पालिका अधिकारी, पाणीपुरवठा विभाग..............