शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड..! आयटीतील प्रवाशांची होतेय गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 4:07 PM

हिंजवडी : आयटी पार्क परिसरात प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या पीएमपीएमएल बसेसची नेहमीच वर्दळ पहायला मिळते. मात्र, जिथे पीएमपीएमएल बसचे थांबे ...

हिंजवडी : आयटी पार्क परिसरात प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या पीएमपीएमएल बसेसची नेहमीच वर्दळ पहायला मिळते. मात्र, जिथे पीएमपीएमएल बसचे थांबे आहेत त्या ठिकाणी प्रवाशांना ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशी गैरसोय पहायला मिळत आहे.

त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत असून, संबंधित पीएमपीएल प्रशासनाने सर्व प्रमुख मार्गांवर हक्काचे शेडसह बस थांबे उभे करावे, अशी आग्रही मागणी होत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बस थांब्याजवळ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा गराडा पहायला मिळतो. त्यामुळे, नाइलाजस्तव आलेल्या बसेस भर रस्त्यावर उभ्या राहत असल्याने, त्यातून मार्ग काढत प्रवाशांना बसमध्ये चढताना तारेवरची कसरत करावी लागते.दरम्यान, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पीएमपीएमएलला मिळत असूनही, मूलभूत सोयी-सुविधांअभावी प्रवासी वंचित रहात असल्याचे वास्तव आयटीनगरी परिसरात पहायला मिळत आहे.हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक सक्षम केली पाहिजे, असे मत अनेक संस्था, संघटनांनी व्यक्त केले होते. त्यामुळे, उपनगरातून आयटी पार्ककडे येणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या फेऱ्यासुद्धा वाढविण्यात आल्या. त्यास, नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.दिवसभर, आयटी पार्क परिसरातील सर्वच बसेस प्रवाशांनी तुडुंब भरून असतात. मात्र, ज्या ठिकाणी बसेस थांबतात त्या ठिकाणी, अधिकृत बस थांबा क्वचित निदर्शनास पडतो. अन्यथा जागोजागी नागरिक घोळका करून भर रस्त्यावर बसची वाट पाहत उभे असतात. माण, मारुंजीसह हिंजवडी परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला उत्तम प्रतिसाद देत असूनही, प्रवाशांना मात्र ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशा गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे, पीएमआरडीए, एमआयडीसी, पीएमपीएल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. हिंजवडी-येथील मुख्य चौकात बस थांबा शेड नाही. त्यात, खासगी वाहनेसुद्धा पार्क होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रhinjawadiहिंजवडीGovernmentसरकारPublic Transportसार्वजनिक वाहतूक