पुणे : वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस ताफ्यात आणण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या दोन्ही महापालिकांसह पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून प्रवाशांच्या सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. अनेक बसथांब्यांची दुरावस्था, प्रमुख बसस्थानकांमध्ये स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, पुरेशी आसनव्यवस्था, स्वच्छतेचा अभाव, जुन्या बसमधील आसने तुटलेली अशा अनेक समस्यांना प्रवासी सामोरे जात आहेत. एकीकडे पीएमपी स्मार्ट होत असल्याचा डंका वाजविला जात असताना प्रवासी मात्र पायाभुत सुविधांपासून वंचित असल्याची स्थिती आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत पीएमपीच्या ताफ्यात आतापर्यंत ७५ ईलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. या सर्व बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. तसेच ४०० बस सीएनजी बस खरेदी केल्या जाणार असून त्यातील काही बस मिळाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक मिळणार आहेत. या सर्व बससाठी दोन्ही पालिकांकडून कोट्यावधी रुपये निधी देण्यात आला आहे. पीएमपीच्या ताफ्यातील शेकडो बस झाल्यामुळे नवीन बस तातडीने ताफ्यात येणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रवाशांकडून नवीन बसबाबत आनंद व्यक्त केला जात आहे. पण त्याचबरोबर वषार्नुवर्षे पायाभुत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांच्यात नाराजीही आहे. नवीन बससाठी कोट्यावधी खर्च करणाºया दोन्ही पालिका सुविधांसाठी मात्र पैसा देण्यास हात आखडता घेताना दिसत आहेत. प्रवाशांच्या सुविधा चांगल्या केल्यास त्यातून राजकीय फायदा होणार नाही. पण रस्त्यावर धावणाऱ्या वातानुकूलित बस पुणेकरांना लगेच भावतील, त्याचा राजकीयदृष्ट्या फायदाही होईल, हा त्यामागचा हेतू आहे का?, असा खोचक सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या सुविधां निर्माण करण्यासाठी पैसा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. ------------बस थांबे पीएमपीचे पुणे व पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या भागात सुमारे ४ हजारांहून अधिक बसथांबे आहेत. मात्र, त्यापैकी जवळपास निम्म्या थांब्यांना शेड नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसातच बसची वाट पाहावी लागते. तसेच शेड असलेले अनेक थांबे खुप जुने आहेत. त्यामुळे त्यांचे छत गंजले असून पावसात त्याचा काहीच उपयोग होत नाही. अनेक थांब्यांवरील खुर्च्या तुटलेल्या असून पदपथाच्या कामात रुतल्या आहेत. त्यामुळे अनेक शेड असून असून अडचण नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. ........बस थांबे, बेशिस्त जैसे थे : कोट्यावधींची बस खरेदी, सुविधांसाठी नाही पैसा
बस स्थानकेपीएमपीची स्वारगेट, पुलगेट, डेक्कन, मनपा यांसह अन्य काही ठिकाणी मोठी बसस्थानके आहेत. या बसस्थानकांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. पण याठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था नाही. काही ठिकाणी स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली आहे, तर काही ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीही मिळत नाही. ------------वेळापत्रकबहुतेक बस थांबे, स्थानकांवर अद्ययावत वेळापत्रकच उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या मार्गावरील बस किती वाजता येणार याची काहीच खबरबात नसते. काही स्थानकांवर लावलेले वेळापत्रक फाटलेले आहे. पीएमपीचे संकेतस्थळ व अ?ॅपवरही अद्ययावत वेळापत्रक नाही.-----------बेशिस्तकाही बसचालकांकडून थांब्यावर बस थांबविताना प्रवाशांचा विचारच केला जात नाही. एकतर बस थांब्याच्या पुढे-मागे किंवा भर रस्त्यातच बस उभी केली जाते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना इतर वाहनांमधून वाट काढत बसपर्यंत जावे लागते. ज्येष्ठ नागरिक, महिलांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो.-----------बसपावसाळा सुरू झाला की बसमधे छत्री उघडून बसलेल्या प्रवाशांची छायाचित्र व्हायरल होतात. हे दृश्य यावेळीही कायम आहे. काही बसच्या छत, खिडक्यांची दुरूस्ती न झाल्याने प्रवाशांना अंगावर पाणी घेत प्रवास करावा लागत आहे. काही बसमधील खुच्या तुटलेल्या आहेत. पत्रे उचकटलेले आहेत. बसमध्ये अग्निशमन यंत्र, औषधोपचार पेटी नाही.बीआरटी थांबे............गर्दीमार्गावर पुरेशा बसअभावी बसमध्ये दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. आसनक्षमतेच्या दुपटीहून अधिक प्रवाशांना जावे लागत असल्याने ज्येष्ठ महिला, तरूणींना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांना दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. अनेक मार्गांवरील बसची ही स्थिती आहे. बसमधील चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत.नवीन बसबरोबरच प्रवाशांसाठीच्या पायाभुत सुविधांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. काही बसस्थानकांमध्ये रात्रीच्यावेळी वीजही नसते. चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला हवेत. बसथांब्यांची स्थिती सुधारण्याची गरज आहे.- दत्तात्रय फडतरे. ..................सध्या प्रवाशांना महागड्या ई-बसची गरज नाही. त्या किंमतीत साध्या बस जास्त आल्या असत्या. हा केवळ दिखाऊपणा वाटतो. नागरिकांच्या पैशातून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा प्राधान्याने मिळायला हव्यात. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बसथांबे, स्थानकांवर पुरेशा सुविधा द्यायला हव्यात. - संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंच