शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
2
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
3
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
5
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
6
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
7
"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
8
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
9
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
10
"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा
11
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
12
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
13
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
14
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
16
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
17
"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?
18
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
19
Gold Rates Today : लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दर घसरले; ₹५००० पर्यंत कमी झाला सोन्याचा भाव
20
IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)

पुरंदर तालुक्यातील राजुरीत '' विद्यार्थ्यां'' विना भरली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 1:00 PM

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी घरी राहणेच पसंत केले.

ठळक मुद्देपालक व व्यवस्थापन समितीचा निर्णय  तक्रारखोर शिक्षक हटविण्याची मागणीएका शिक्षकाविषयी गेल्या तीन वर्षांपासून तक्रार

भुलेश्वर : सगळीकडे  शाळेच्या पहिल्या दिवशी वाजतगाजत गुलाबपुष्प देऊन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतात. मात्र, पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी प्राथमिक शाळेत तक्रार केलेल्या शिक्षकाची बदली न झाल्याने पालकांनी एकाही विद्यार्थ्याला शाळेत पाठवले नाही. उलट शाळेत सर्व पालकांची मिटिंग घेऊन शिक्षण विभागावर ताशेरे ओढले. यामुळे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी घरी राहणेच पसंत केले. यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी राजुरीची प्राथमिक शाळा पटाविना भरवण्यात आली.राजुरी येथील एका शिक्षकाविषयी गेल्या तीन वर्षांपासून राजुरी ग्रामस्थ व शाळा  व्यवस्थापन समिती यांनी वारंवार तक्रार केली आहे. यामुळे या शिक्षकाची तातडीने बदली करण्याची मागणी राजुरी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने केली होती. राजुरी ग्रामसभेतही बदलीची मागणी केली होती. मात्र, शिक्षण विभागाने या सर्व ठरावांना वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या.शिक्षक शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या शाळेवरती येत नसतानाही त्यांचा पगार शिक्षण विभागाने काढला. यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून शिक्षण विभागाने राजुरी येथील शाळा व्यवस्थापन समितीला काही महत्त्वच नसल्याचे दाखवून दिले.यामुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तक्रारदार शिक्षकाची बदली न झाल्यास राजुरी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती उन्हाळ्याच्या सुटीनंतर प्राथमिक शाळा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले.  शिक्षण विभागाने आश्वासन देऊन फक्त समाधान केले. मात्र, कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे आज गावातील ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने आज एकही विद्यार्थी  शाळेत पाठवला नाही. यामुळे राजुरी प्राथमिक शाळा आज पटाविना भरवण्यात आली. पालकांनी सकाळी अकरा वाजता शाळेच्या आवारात ग्रामस्थांनी बैठक घेतली.यात शिक्षण विभागावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत तक्रारदार शिक्षकाची बदली होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नसल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी  शिक्षक व ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वादात राजुरीची प्राथमिक शाळा पटाविना भरवण्यात आली. यावेळी राजुरीचे सरपंच उद्धव भगत, शशी गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकगायकवाड, उपाध्यक्ष संदीप भगत, माजी उपसरपंच संभाजी चव्हाण, सुखदेव भगत, पंढरीनाथ शिवरकर, नामदेव बनकर, दिलीप भगत, सुधाकर भगत, दादासो भगत, परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ...........४ गावातील एकाही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नाही, यामुळे शिक्षक येऊनही पहिल्याच दिवशी राजुरीची प्राथमिक शाळा पटाविना भरवण्यात आली. ४आज झालेल्या बैठकीत जोपर्यंत तक्रारदार शिक्षकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही शाळा पटाविना भरणार आहे.येत्या पंधरा दिवसांत नवीन शिक्षक न आल्यास मुलांचे दाखले काढणार.४शाळेत बैठक घेण्यात आली व पुरंदरच्या शिक्षणअधिकाºयांना गावचे सरपंच उद्धव भगत यांनी फोन लावला, पण अधिकाºयांनी मात्र फोन न घेणेच पसंत केले. ४यामुळे तक्रारदार शिक्षकाची बदली न झाल्याने मुलांना शाळेत पाठविले नाही, तर पंधरा दिवसांत नवीन शिक्षक न आल्यास मुलांचे दाखले काढणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. राजुरी केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख रोहिदास कोलते यांनाही निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी धारेवर धरले. .............४शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले की, तक्रारदार शिक्षक कृष्णा चव्हाण यांच्यामुळे शाळेची गुणवत्ता कमी झाली शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार सूचना देऊनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. ४त्यांच्या बद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या खूप तक्रारी आहेत. हे राजुरी येथील शाळेवर येत नसतानाही शिक्षण विभागाने त्यांचा पगार काढला .यामुळे शासन मराठी शाळा चालवते की बंद करते हेच कळत नाही. या शिक्षकाची तातडीने बदली करण्यात यावी.४ पुरंदर तालुका शिक्षण अधिकारी लोंढे म्हणाले की, राजुरी प्राथमिक शाळेला एक शिक्षक देण्यात आलेला आहे. ज्या शिक्षकाविषयी तक्रार आहे, त्या शिक्षकाचा कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे. ४सरपंच राजुरी उद्धव भगत म्हणाले की, गेली तीन वर्षे कृष्णा चव्हाण या शिक्षकाची वारंवार तक्रार येत होती. राजुरी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद शिक्षणअधिकाºयांकडे वारंवार तक्रारी केल्या. ग्रामसभेमध्ये या शिक्षकाच्या बदलीचा ठरावही करण्यात आला. मात्र, शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. 

टॅग्स :PurandarपुरंदरSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक