शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

दुप्पट पाणी घेऊनही पुण्याची भागेना तहान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:00 PM

जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.

ठळक मुद्देपाणी वितरणाचे नियोजन,गळती रोखणे,पुनर्वापरावर भर गरजेचाएका व्यक्तीने दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षितलोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर

पुणे: महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या पाण्याच्या दुप्पट पाणी सध्या पुणे महापालिका वापरत आहे. पालिकेला लोकसंख्येच्या आधारे अधिक पाणी मिळवता येणार आहे. मात्र, पुढील वीस वर्षांनंतर आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर सध्या पालिकेकडून केला जात असल्याने पुणे शहराची तहान कधीही भागणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.त्यामुळे पाणी वितरणाचे योग्य नियोजन,पाण्याची गळती व चोरी रोखणे आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याशिवाय पालिकेला कोणताही पर्याय नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.एका व्यक्तीने अंघोळ,बाथरूम,पिण्याचे पाणी, कपडे, भांडे धुण्यासाठी दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून या नियमाच्या आधारेच पाणी मंजूर केले जाते. पुणे महापालिकेने सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. त्यानुसार पालिकेने दररोज ६३५ दशलक्ष घन मिटर (एमएलडी) पाणी वापरावे अशी अपेक्षा आहे.मात्र,पालिकेकडून १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. शहराची वाढती लोकसंख्या,पालिका हद्दीत समाविष्ट होणा-या गावांची संख्या आणि तर ती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात असून वाढी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी पालिकेला एक कोटी लोकसंख्येचा आकडा दाखवता येणार नाही.पालिकेने सप्टेबर २०१७ मध्ये जलसंपदा विभागाला सादर केलेल्या दिलेल्या शपथपत्रामध्ये शहराची लोकसंख्या २०३२ पर्यंत ५२ लाख ७१ लाख होईल,असे नमूद केले होते. त्यावर पालिकेला २०३२ मध्ये १२.८३ टीएमसी पाणी पुरेसे होईल,असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले होते. मात्र,पालिकेकडून तब्बल १७ टीएमसी पाण्याची मागणी केली जात आहे.परंतु, जुलै २०१८ पासून फेब्रुवारी २०१९ पर्यंत पालिकेने एकाही महिन्यात सरासरी १३०० ते १३५० एमएलडी पेक्षा कमी पाणी वापरले नाही. त्यामुळे पालिकेकडून नहेमीच मंजूर पाण्याच्या दुप्पटच पाणी वापर होत असल्याचे दिसून येते.परिणामी पालिकेला मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवावी लागणार आहे.त्यासाठी पालिकेने शहरातील जलवाहिन्यातून होणारी पाण्याची चोरी व गळती थांबविणे गरजेचे आहे. मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देवून त्याची क्षमता वाढवणे,पाण्याचे वितरण योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.------------------पुणे महापालिकेला मंजूर झालेल्या पाण्यात पुणे शहराची तहान भागवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचे वितरण नियोजनबध्द पध्दतीने करण्याची आवश्यकता आहे.मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवण्याचे ठरवले तर पाणी कमी पडणार नाही.मात्र,नियोजनाकडेच दूर्लक्ष होत आहे.- सुरेश शिर्के ,माजी सचिव,जलसंपदा विभाग

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका