कान्हूरमेसाई : शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई व परिसरात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकº्यांच्या हातात मात्र अजूनही काम पडलेले नाही. कान्हूरमेसाई पाबळ तसेच या परिसरातील १२ गावांत यावर्षी पाऊस न झाल्याने शेतकº्यांचे आर्थिक चित्र पूर्णपणे कोलमडले आहे.
मजुरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांच्यावरही शेतकऱ्याप्रमाणे हतबल होण्याची वेळ आली आहे. यंदा परतीच्या पावसानेदेखील हुलकावणी दिल्याने शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. त्यामुळे २०१८ हे वर्ष अतिशय निराशाजनक ठरत आहे . सन २०१९ या वर्षाला सुरवात होत असताना जानेवारी ते जुलै दरम्यान भीषण जलसंकट राहणार आहे . त्यामुळे ग्रामस्थांपूढे पिण्याच्या पाण्याचे संकट आहे . गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होणार आहे. दुष्काळ जाहीर झाला पण हातात काय? यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने तालुका दुष्काळी घोषित केला. मात्र, महागडी बियाणे वापरुन लागवड केलेला कांद्याला भाव नाही. त्यामुळे शेतीचा खर्च देखील निघाला नाही. उसावर हुमणीचे आक्रमण झाले आहे . विधानसभेचे माजी अध्यक्ष ,आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागाची पहाणी देखील केली. त्यामुळे परिसरातील शेतकरी व मजूर वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु शेतकºयांच्या पदरी काय पडणार हा प्रश्न कायम आहे . त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.शासनाकडून शेतकºयांच्या अपेक्षाकान्हूरमेसाई परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने उत्पन्नात घट झाली.शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे शासनाने शेतसारा पूर्ण माफ करावाकर्जमाफीपासून वंचित शेतकºयांना कर्ज माफ करावे.मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयोची कामे सुरू करावी.