अमोल अवचितेपुणे : नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची २ वर्षांपासून भरती करण्यात आलेली नाही. या विभागाचा प्रमुख पाया स्वयंसेवक आहे. आता तेच राहिले नसल्याने या विभागाचे कर्मचारी नेमके काय काम करतात, असा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे शासनाकडून या दलावर येणारा खर्च वाया जात आहे .प्राथमिक कोर्सेसचे आयोजन करणे व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र बनवणे, भत्ता काढणे, स्वयंसेवकांना पालखी, गणेशोत्सव, आपत्तीच्या घटना, निवडणूक बंदोबस्त, महसूल कर्मचारी संप बंदोबस्त, पूर नियंत्रण कक्षस्थळी ड्यूटी लावणे आणि त्यांचा आढावा घेणे. अशा स्वरूपाची साधारण कामे असत. मात्र, आता फक्त शासकीय सेवकांनाच फक्त प्रशिक्षण देण्यात येते.
आॅफिसमध्ये येणाºया सेवकांचे हजेरी पत्रक, रजा, शासकीय खर्च यांच्या नोंदीशिवाय वरील स्वरूपाची कोणतेही कामे नसतात. त्यामुळे या विभागाला फक्त सरकारी सेवकांच्या पगारी पुरतेच मर्यादित स्वरूप आले आहे. ना. सं. दलाचे प्रशिक्षणाचे साहित्य बरीच वर्षे पडून जुने झाल्याने त्याला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेच भंगार आॅफिसच्या काही सेवकांनी विकून पैसे खाल्ल्याची माहिती स्वयंसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. पुणे विभागाने अनेकदा उल्लेखनीय काम केल्याची ही उदाहरणे आहेत. १९९३ साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये स्वयंसेवकांनी उल्लेखनीय काम केल्याचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी उलेख केला होता. या वेळी पुण्यातून ३० स्वयंसेवकांची टीम सुरेश लुगडे, दिलीप जाधव या मानसेवी अधिक ाºयाांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजावले होते. गुजरात, ओरिसा आदी ठिकाणी आपत्तीच्या वेळी माहाराष्ट्रातून सुमारे ५०० ते ६०० होमगार्ड आणि ना. सं. दलाचे स्वयंसेवकांनी कर्तव्य बजावले होते. अशी माहिती मानसेवी अधिकारी योगेश परदेशी यांनी दिली. असे असताना ही सभासद नोंदणी बंद करणे योग्य नसल्याचे स्वयंसेवक बोलत आहेत. २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे रोजी स्वयंसेवकांना पोलीस परेड ग्राऊंडवर परेड करण्याचा मान मिळत असे.त्यामुळे स्वयंसेवकांची देश भावना वाढण्यास मदत होत होती. एकूणच ना. सं. दलातील सरकारी सेवक बसूनच शासनाचा पगार घेत असल्याचे दिसून येत आहे.स्वयंसेवकांची भरती बंद असल्याने कार्यालयीन कामकाज तेवढेहोते. शासकीय प्रशिक्षण यादीची नोंदणी ठेवली जाते.- अनिल आवरी,उपनियंत्रक ना. सं. दल, पुणे.पुणे विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात. पुणे व मुंबई विभागाला मिळून एकच उपनियंत्रक आहेत. ते आठवड्यातून ३ दिवस पुणे, तर मुंबईला ३दिवस, असे कामकाज पाहतात.