पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी पातळीने सर्वत्र शंभर डेसिबलच्या वर नोंदवली गेली. त्यामुळे हा आवाज सामान्यांना अत्यंत असह्य झाला. या वर्षीचा एकंदर आवाज सर्वाधिक (सरासरी १०५.२ डेसिबेल्स) नोंदवला गेला. तर खंडुजीबाबा चौकात रात्री ८ वाजता १२९.८ डेसिबल ही सर्वाधिक पातळी नोंदविण्यात आली. लक्ष्मी रस्त्यावर सर्वत्र दिवस-रात्रीच्या नियमातील सरासरीपेक्षा दुपटीने हा आवाज होता. दोन दिवसात येथील वातावरण अतिशय त्रासदायक होते, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी नोंदवली.
दरवर्षी गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये आवाजाची पातळी मोजण्याचे काम सीओईपी महाविद्यालयातर्फे करण्यात येते. यंदा देखील त्यांनी हा आवाज नोंदविला. सीओईपीचे उपयोजित विज्ञान व मानव्य विद्या विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांनी सर्व नियोजन केले. त्यांना जयवंत नांदोडे आणि इशिता हुमणाबादकर यांनी मदत केली. तर विद्यार्थी स्वयंसेवकांमध्ये प्रत्यक्ष मोजणी सुयोग लोखंडे, इंद्रजीत देशमुख, पार्थ धोटे, रणदिग्विजय जाधव, अथर्व डांगे, आदित्य संजीवी, आनंद पानजकर, तेजस जोशी, शार्दुल लोकापुरे यांनी केले. आकडेवाडीचा निष्कर्ष इरा कुलकर्णी, सात्विका उदयकुमार, समृद्धी तागडे, गायत्री ठकार यांनी केले. तर माजी विद्यार्थी पद्मेश कुलकर्णी, नागेश पवार यांनी सहकार्य केले. या वर्षी मुख्य मिरवणूक झालेल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या १० प्रमुख चौकात २८-२९ सप्टेंबर २०२३ या दिवशी दर चार तासांनी निरीक्षणे नोंदविण्यात आली. लक्ष्मी रस्त्यावरील २४ तासातील आणि १० चौकातील आवाजाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. हा उपक्रम गेली २२ वर्षे नित्यनेमाने होत आहे.
गेल्या काही वर्षात कार्यकर्ते आणि भाविक यांच्यात ध्वनी प्रदुषणाबाबत जागृती वाढल्याचे निदर्शनास आले, आवाजाच्या पातळी मोजण्याच्या प्रक्रियेबद्दल देखील उत्सुकता जाणवली. मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी या कामात स्वत:हून मदत केली. - डॉ. महेश शिंदीकर, सीओईपी
आवाजाची दिलेली मर्यादा
क्षेत्र दिवसा (डेसिबल) रात्री (डेसिबल) स. ६ ते रात्री १० रात्री १० ते स. ६ औद्योगिक ७५ ७०व्यापारी क्षेत्र ६५ ५५निवासी क्षेत्र ५५ ४५शांतता क्षेत्र ५० ४०
लक्ष्मी रस्त्याच्या १० प्रमुख चौकातील ध्वनीपातळी
२८ सप्टेंबर २९ सप्टेंबरचौकाचे नाव - दुपारी - सायं - रात्री मध्यरात्री - पहाटे - सकाळी - चौकातील सरासरी बेलबाग - ९८.४ -११२ - ८३.२ ९६.२ - ९६.९ --११९ --१००.९गणपती - १०८.४ -११३ - ११६ ८७.२ - ९६.४ --११६.४ ---१०६.३लिंबराज - ११२.७ - १०१ - १११ १०४.१- ८१.७ --१२५ ---१०६कुंटे - १०८.४ - ११४ - १२३.९ ९१.८ - ८७.३ ---११८.९ ---१०७.४ उंबऱ्या - १०९.८ - १०३ - १०७.२ ८६.३ - ९१.६ ---१२९.८ ----१०३.१गोखले - ९८.२ - १०४ - ११७.३ ८७ - ७७ ---११५.४ ------९९.८ शेडगे विठोबा-८५.२ -९८.३ - ११९.४ ८५ - ७५.८ ---११५.३-----९६.५होळकर - ८२.९ -१०५ - ११८.५ ९४.४ -८१.७ ----११६ -----९९.९टिळक - ८६.४ - ९०.९ - ११९ ९४.७ - ९१.५ ------११७ ----१००खंडोजीबाबा - ९६.६- ८३.६ - ११५ ६२.९ - ६२.९------११९.९----९०.२
सरासरी - १००.२--१०२- ११३.७ ८९ - ८४,३------११८.५ -----१०१.३