शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निनादले बँडचे सूर...

By admin | Published: March 21, 2017 5:30 AM

विविध दिव्यांच्या रोषणाईने सजलेला परिसर... एनडीएच्या बँड पथकाचे मधुर स्वर... माजी विद्यार्थ्यांच्या लघुपटांचा आस्वाद घेण्याची संधी

पुणे : विविध दिव्यांच्या रोषणाईने सजलेला परिसर... एनडीएच्या बँड पथकाचे मधुर स्वर... माजी विद्यार्थ्यांच्या लघुपटांचा आस्वाद घेण्याची संधी आणि कलात्मकतेचा देदीप्यमान इतिहास उलगडणारे ‘डाऊन मेमरी लेन’ प्रदर्शन... अशा चैतन्यदायी वातावरणात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाची (एफटीआयआय) वास्तू उजळून निघाली. निमित्त होते, संस्थेच्या ५७व्या स्थापनादिनाचे.संस्थेचे आवार व प्रसिद्ध ‘विज्डम ट्री’चा परिसर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने नटला होता. संस्थेचा इतिहास उलगडणाऱ्या छायाचित्रांचे ‘डाऊन मेमरी लेन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वाळूचा वापर करून कला साकारणारे सुदर्शन पटनाईक यांच्या हस्ते झाले. माजी विद्यार्थ्यांचे लघुपटदेखील या वेळी दाखविण्यात आले. क्रांती कानडे यांनी बनवलेला ‘चैत्र’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘गिरणी’, अरुण सुकुमार यांचा ‘व्हेन धिस मॅन डाइज’, कौशल ओझा यांचा ‘आफ्टरगो’, आंद्रे्रे लॅनेटा यांचा ‘अल्ला इज ग्रेट’ आणि तुषार मोरे दिग्दर्शित ‘सदाबहार ब्रास बँड’ या लघुचित्रपटांचा रसिकांनी आस्वाद घेतला. ज्येष्ठ कलावंत व माजी विद्यार्थी अरविंद सायगावकर, सुदर्शन पटनाईक, संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव वरुण भारद्वाज, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता अमित त्यागी व दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक या वेळी उपस्थित होते. ‘‘एफटीआयआयची वास्तू मला शांतीनिकेतनसारखी भासते. ही संस्था म्हणजे चित्रपटांचे गुरूकुल आहे,’’ अशी भावना सुदर्शन पटनाईक यांनी व्यक्त केली.