बारामती : खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ज्यांना ढाण्या वाघाची उपमा दिली अशा वंचित बहुजन विकास आघाडीतून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध बारामतीतून लढण्याचे संकेत दिले होते. परंतु, महायुतीची घोषणा झाल्यानंतर बहुचर्चित व प्रतिक्षित भाजपची १२५ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यात गोपीचंद पडळकर यांचे नाव आले नसल्याने त्यांची उमेदवारी 'वेटिंग'मोडवर असल्याची चर्चा आहे.
ऐनवेळी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अजित पवार यांच्या विरोधात संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी सोमवारी(दि ३० ) बहुजन वंचित आघाडीतुन भाजपामध्ये प्रवेश केलेल्या गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधुन निवडणुक लढवावी.याबाबत पक्षप्रमुखांशी चर्चा करु असे सांगत पडळकर यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पाठिंबा दिला होता.मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत बारामतीची उमेदवारी जाहिर करण्यात आले नसल्याने पडळकर यांची उमेदवारी सध्या तरी लटकल्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादी काँंग्रेसचे नेते शुक्रवारी(दि ४) त्यांचा उमेदवारी अर्जदाखल करणार आहेत.याच दिवशी पवार त्यांचा प्रचार शुभारंभ करणार आहेत.गेल्या अनेक दिवसांपासुन पवार यांच्याविरोधात कोण याविषयी उत्सुकता होती.मुख्यमंत्र्यांनी पडळकर यांच्या नावाची बारामतीसाठी घोषणा केल्याने त्या उत्सुकतेला पुर्णविराम मिळाल्याचे मानले जात होते.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती.
बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे.या पार्श्वभुमीवर भाजपने पुन्हा जातीचे कार्ड वापरत पडळकर यांना उमेदवारी दिल्याचे मानले जात होते.मात्र, पडळकर यांचे पहिल्या यादीत नाव न आल्याने माशी कोठे शिंकली,याचीच चर्चा शहरात रंगु लागली आहे.विधानसभा मतदारसंघात पडळकर यांचे नाव जाहीर होण्यापुर्वी अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या वतीने नऊ जण इच्छुक होते.शिवाय बाळासाहेब गावडे,दिलीप खैरे,अविनाश मोटे यांची नावे देखील भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चेत होती.मात्र,रविवारी(दि २९) सायंकाळपासुन अचानक पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांनी नाव जाहिर केल्यानंतर इतर इच्छुकांची नावे झाकोळली गेली होती. मंगळवारी जाहीर झालेल्या भाजपच्या यादीत पडळकरांचे म्हणजेच बारामतीच्या उमेदवाराचा उल्लेख नसल्याने भाजपच्या जुन्या इच्छुकांना संधी मिळण्याची धुसर आशा निर्माण झाल्याची चर्चा आहे.आयात उमेदवाराला युतीपैकी शिवसेनेचा विरोध होता.आता शिवसेनेने इंदापुरसह बारामती मतदारसंघ भाजपसाठी सोडला आहे.त्यामुळे १९९१ पासुन २०१४नंतर यंदा २०१९ मध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकींमध्ये प्रथमच शिवसेनेचा उमेदवार विधानसभेच्या रिंगणात नसणार आहे.————————————...भाजपपाठोपाठ बहुजन वंचित आघाडीचे देखील जातीचे कार्ड
भाजपपाठोपाठ बारामती विधानसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीने जातीचे कार्ड वापरत धनगर समाजाचे अविनाश गोफणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.गोफणे हे पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत.राष्ट्रवादीच्या वतीने गोफणे यांनी बारामती पंचायत समितीचे सभापती पद भुषविले आहे.त्यानंतर राष्ट्रवादीपासुन फारकत घेत भाजपशी जवळीक साधली होती.भाजपने गोफणे यांची माळेगाव कारखान्याच्या शासन नियुक्त संचालक पदी निवड केली होती.मात्र, कारखान्याच्या अध्यक्षांसमवेत भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरुन मतभेद झाल्याने गोफणे यांना संचालक पदावरुन दुर करण्यात आले होते.त्यामुळे भाजपपासुन दुरावलेल्या गोफणे यांना बहुजन वंचित आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.————————————————