शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नोटाबंदीचा फटका बांधकाम विभागास

By admin | Published: April 10, 2017 2:41 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले आहे. नोटाबंदीचा फटका बांधकाम व्यवसायास

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले आहे. नोटाबंदीचा फटका बांधकाम व्यवसायास झाल्याने परिणामी बांधकाम परवाना विभागाचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. मात्र, बांधकाम परवाना घेण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी मार्चअखेर ३६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या आर्थिक वर्षात ३२० कोटींचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीपेक्षा ४४ कोटींची घट आली आहे.पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा हळूहळू बदलत असून, नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. रहिवासीकरणाबरोबरच कर्मिशयल कॉम्प्लेक्स, नामांकित हॉटेलची भर पडत आहे. त्यातच गेल्या वर्षभरात महापालिकेने अवैध बांधकामांविरुद्ध जोरदार मोहीम राबविल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १ हजाराहून अधिक बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली आहे. पिंपरी-चिंचवड परिसराला लागून असणाऱ्या हिंजवडी, तळवडे, तळेगाव, पुणे शहरातील कॉल सेंटर तसेच इतर क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. जागेच्या उपलब्धतेमुळे बड्या उद्योगांनी पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरात उद्योगधंदे उभारले आहेत. हिंजवडीसारख्या भागात आयटी पार्क विकसित झाला असला, तरीही मूलभूत सुविधांमुळे या उद्योगांमध्ये स्थावर झालेल्यांकडून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास पसंती दिली जात आहे. न्यायालयीन निर्णय आणि शासन आदेशामुळे ३१ मार्च २०१२ नंतरच्या बांधकामांना अभय न देण्याचे धोरण महापालिकेने राबविले. तसेच, अवैध बांधकामाविरुद्ध जून २०१२ पासून तीव्र मोहीम सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानुसार, ३५ हजार १९६ बांधकाम मालकांना नोटीस बजाविण्यात आल्या. दोन हजार २८६ घरमालकांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच दोन हजार ३३ बांधकामे भुईसपाट करण्यात आली. अवैध बांधकामांविरुद्धच्या कारवाईमुळे रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करणाऱ्यांची संख्या वाढली. गतवर्षी बांधकाम परवानगी घेतलेल्यांची संख्या १ हजार होती. ती या वर्षी १ हजाराहून अधिक झाली आहे. निवासी बांधकामांच्या तुलनेत व्यावसायिक बांधकामांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. बांधकाम परवाना विभागाला ३६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तथापि, ३२० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. शहरात बांधकामांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराच्या विकासात चौफेर वाढ होत असल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. (प्रतिनिधी)छोट्या बांधकामांना सवलत देण्याचा निर्णय१ पिंपरी : औद्योगिकनगरीतील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे छोट्या भूखंडावरील रहिवासी बांधकामासाठी बाजूच्या सामासिक अंतरामध्ये अर्थात साईड मार्जिनमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. ही अनधिकृत बांधकामे टाळण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील छोट्या आकारांच्या केवळ मोकळ्या रहिवासी भूखंडाकरिता अर्थात २० ते १२५ चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्यांना एफएसआय आणि समोरील सामासिक अंतर यामध्ये कोणतीही सवलत व देता बाजूच्या सामासिक अंतर म्हणजेच साइड मार्जिनमध्ये सवलत देऊन बांधकाम परवानगी देण्यात येणार आहे.३त्यामुळे नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन अनधिकृत बांधकाम न करता परवानगी घेऊन बांधकाम करावे, असे आवाहन केले आहे.महापालिका हद्दीतील सर्व भूखंडधारकांना महापालिकेच्या प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानगी देण्यात येते. ४या नियमानुसार मोठ्या भूखंडधारकांनाही आवश्यक परवानगी मिळते. पण २० ते १२५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडधारकांना या नियमानुसार परवानगी दिल्यास त्यांच्या किमान गरजाही पूर्ण होत नाहीत. या बांधकाम परवानगीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही केवळ भूखंडाचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे नियमानुसार परवानगी नाकारण्यात येते.