शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

शाळांकडून अधिकाऱ्यांशी असहकार

By admin | Published: May 04, 2017 3:08 AM

शुल्कवाढीसह विविध तक्रारींबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना योग्यप्रकारे सहकार्य केले जात नसल्याचे पुन्हा

पुणे : शुल्कवाढीसह विविध तक्रारींबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना योग्यप्रकारे सहकार्य केले जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सातारा रस्त्यावरील एका शाळेने अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे या शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात केली आहे.शिक्षणाधिकारी; तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पालकांकडून शुल्कवाढ, शैक्षणिक साहित्य विक्री अशा विविध प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. शिक्षण मंडळाचे अधिकारी नुकतेच सातारा रस्त्यावरील एका शाळेत चौकशीसाठी गेले होते. या चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेकडे पालक-शिक्षक संघ बैठक, शुल्कवाढ यांसह विविध मुद्यांवर कागदपत्रांची मागणी केली; मात्र या शाळेकडून कोणतीही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. सहकार्य केले जात नसल्याने शाळेला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे, अशी शिफारस संबंधित अधिकाऱ्यांनी विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे केली आहे. हा अहवाल दि. १५ व १६ मे रोजी होणाऱ्या विभागीय शुल्क नियंत्रण समितीच्या बैठकीत सुनावणीवेळी सादर केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.शुल्कवाढीसंदर्भात तक्रारी आलेल्या जवळपास २० शाळांकडून शुल्कवाढीच्या मुद्यावर विविध माहिती मागविण्यात आली आहे. त्यामध्ये पालक-शिक्षक संघाची स्थापना, आधीची शुल्कवाढ, येत्या शैक्षणिक वर्षासाठीची शुल्कवाढ, कार्यकारी समितीची मान्यता अशाप्रकारच्या माहितीचा समावेश आहे. काही शाळांनी अद्यापही माहिती दिलेली नाही, तर यातील काही शाळांनी न्यायालयात दाद मागितली आहे. ज्या शाळा न्यायालयात गेल्या आहेत, त्यांची समितीसमोर सुनावणी होणार नाही. उर्वरित शाळांची सुनावणी घेतली जाईल. शाळांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून शुल्कवाढ योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल विभागीय समितीपुढे ठेवला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.