शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

साहित्यबाह्य घटकांनी संमेलनामध्ये वृथा लुडबूड करू नये : प्रेमानंद गज्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 7:46 PM

मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं आजवर कोणत्या धर्माच्या लोकांनी सर्वाधिक भूषवली?..

ठळक मुद्देसाहित्य संमेलनात बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये, संमेलन शांतपणे होऊ द्यावे

पुणे : हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध,जैन धर्मियांबरोबरच आदिवासी,भटकेही मराठी भाषेत लेखन करतात. या सर्वांचा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर सारखाच अधिकार आहे. हा अधिकार प्राप्त होत असतांना लेखकाचं वाडमयीन कर्तृत्व जोखलं जातंच आणि तरीही कुणी धर्म वेगळा म्हणून साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नाकारत असेल तर हे मराठी भाषेला भूषणावह नाही, अशा शब्दांत नाट्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी विरोधकांना सुनावले आहे. मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं आजवर कोणत्या धर्माच्या लोकांनी सर्वाधिक भूषवली? तेव्हा कुणी आकांत केला नाही असा सवाल उपस्थित करीत एक फादर अध्यक्ष निवडला जाताच हिंदू मानसिकता विरोधात उभी राहिली याविषयी खेद व्यक्त केला आहे.  सोशल मीडियावरील प्रेमानंद गज्वी यांची ही पोस्ट साहित्यवातुर्ळात चचेर्चा विषय ठरली आहे.  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड केल्याबददल हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाचा सूर आळविला आहे. हे साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भाषा केली जात आहे. त्यावर भाष्य करताना मराठी साहित्य संमेलन वाङमयकार दिब्रिटो यांच्या अध्यक्ष निवडीने संकटात सापडणार असं दिसू लागलंय. काही हिंदुत्ववादी विरोध करताना दिसत आहेत असे नमूद करून गज्वी यांनी नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची पाठराखण केली आहे. ...............' लोकमत' शी बोलताना प्रेमानंद गज्वी म्हणाले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला विरोध करणारे साहित्यबाहय घटक ज्यांचा वाचक म्हणून संबंध असणे वेगळे, पण स्वत: लेखक किंवा साहित्यनिर्मितीशी नसेल तर अशा लोकांनी आम्ही हिंदू आहोत म्हणून त्याला विरोध करणे. कारण ते फादर आहेत तर त्याला काही अर्थ राहत नाही. त्यांची निवडप्रक्रिया चुकीची असती तर विरोध करणे समजू शकतो. पण तसे काही घडलेले नाही. संंमेलन आम्ही होऊ देणार नाही असे म्हणत असतील तर आत्तापर्यंत साहित्याबाहय लोकांनीच हैदोस घातला आहे. साहित्य संमेलनात बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये आणि साहित्य संमेलन शांतपणे होऊ द्यावे. ----------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन