अनुसूची क्षेत्रात देण्यात येणा-या सेवा सुविधांच्या दर्जा मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने स्थानिक बोली भाषा, संस्कृती व ज्ञानाच्या अभावाने संदेश वहनात अडथळे येऊ नये यासाठी अनुसूचीत जमातीच्या लोकांना प्राधान्य दिले आहे. परंतु आंबेगाव तालुक्यात अनुसूची क्षेत्रात रहाणा-या आदिवासी व बिगर आदिवासी समाजाच्या लोकांची बोलीभाषा एकसारखी असून त्यांच्या दैनंदिन संभाषण होत असते, शिक्षण पद्धती एक सारखीच असल्याने येथे रहाणा-या सर्वच समाजातील लोकां मध्ये संदेश वहनाचा अडथळा निर्माण होत नाही.
अनुसूची क्षेत्र हे त्या भागात रहाणा-या विशिष्ट जाती साठीच आहे असा उल्लेख संवंधिनात नसतानाही त्या भागात रहाणा-या खुला वर्ग, इतर मागास वर्ग,अनुसूचीत जातीच्या लोकांवर अन्याय होत असून सरपंच आरक्षण सोडतीत या प्रवगार्तील लोकांना डावलले जाते आहे. ८ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या आंबेगाव तालुक्याच्या आरक्षण सोडती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला ४०, इतर मागासवर्गीय प्रवगार्साठी १७, अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी तीन तर अनुसूचीत जमाती साठी ४२ ठिकाणी आरक्षण निघाले. यातील अनुसूची क्षेत्रातील सरपंच पदाच्या सोडतीवर आमचा आक्षेप असून आम्हाला न्याय द्यावा किंवा आरक्षणात इतर समाजाला का डावलले जाते या बाबत माहिती मिळावी अशी मागणी गौतम खरात यांनी केली आहे.