शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

लेखकाचे काम समाजाला भडकवण्याचे नव्हे : बिजेंद्र पाल सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:39 PM

लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे.

ठळक मुद्देतब्बल 22 वर्षांनी एफटीआयआय संस्थेमध्ये पदवी प्रदान समारंभ

पुणे : लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे. त्याच्या शब्दांनी जग बदलू शकते, अशा शब्दांत एफटीआयआयचे अध्यक्ष बिजेंद्र पाल सिंग यांनी लेखकांचे महत्व विशद केले.     तब्बल 22 वर्षांनी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेमध्ये पदवी प्रदान समारंभ पार पडला. अंगात केशरी गाऊन, डोक्यावर पुणेरी पगडी...मान्यवरांच्या हस्ते प्रथमच प्रमाणपत्र घेण्याचा अनुभव...विद्यार्थ्यांचे खुललेले चेहरे अशा भारावलेल्या वातावरणात हा पदवीप्रदान सोहळा रंगला. बिजेंद्र पाल सिंग यांच्या हस्ते टिव्ही विभागातील 2014-2015,2015-2016 आणि 2017-2018 या बँचमधले पदव्युत्तर विद्यार्थी तसेच चित्रपट विभागातील पटकथा लेखन अभ्यासक्रमाच्या 2016-2017 आणि 2017-2018 बँचच्या अशा एकूण विद्यार्थ्यांना 148 प्रमाणपत्रे देण्यात आली. याप्रसंगी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव वरूण भारद्वाज, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आणि टिव्ही विभागाचे अधिष्ठाता आर एन पाठक उपस्थित होते. सीआयडी मालिकेचे तब्बल 19 वर्षे लेखन करणारे  बिजेंद्र पाल सिंग म्हणाले, लेखकांच्या लेखणीमध्येच समाज बदलाचे सामथर््य आहे. आज टिव्ही आणि चित्रपट माध्यम बदलले आहे. व्यावसायिक आणि अव्यावसायिक ही दरी कमी झाली आहे. वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट किंवा मालिका बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहेत. हे लेखकांमुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे यशस्वी लेखक व्हायचे असेल तर स्वत:मध्ये बदल घडवावे लागतील. एखादी मालिका यशस्वी झाली की लेखकांची जबाबदारी वाढते. मात्र एक चांगला माणूस बनल्याशिवाय चांगला लेखक होऊ शकत नाही. दुस-याची दु:ख समजण्याची ताकद नसेल तर लेखन क्षेत्रात पुढे जाता येणे शक्य नाही. मी अनेक वर्षे सीआयडी लिहीत होतो. तुम्हाला कंटाळा आला नाही का? असे सातत्याने विचारले जायचे. पण मी जबाबदारी समजून लेखन केले. भारत हा प्रकर्षाने बदलत आहे. त्यामुळे लेखकांना आपण कुणासाठी लिहीत होतो,  कुणासाठी लिहायचे आहे हे .विद्यार्थ्यांना समजावे लागेल. भाषेत बदल करावा लागेल असा कानमंत्रही त्यांनी  दिला. जगभरात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. जे आज शिकलो ते भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत जाणार आहे. पण लेखक आणि दिग्दर्शन क्षेत्राला याचा फटका बसणार नाही. मनोरंजन क्षेत्रात लेखकांची कायमच निकड भासणार आहे. लेखकांची मागणी खूप आहे .मात्र हवा तेवढा पुरवठा होत नाही, अशी सध्याची मनोरंजनाची स्थिती आहे. त्यामुळे दिग्दर्शक, निमार्ता लेखकांवर अवलंबून आहेत. ते येतील आणि नवीन कल्पना सुचवतील. यासाठी लेखकांनी वाचन, निरीक्षण आणि ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या विविध अभ्यासक्रमांची भूपेंद्र कँथोला यांनी माहिती दिली.------------------------------------------------------------मी मूळचा नगर जिल्ह्यातील आहे. त्या भागात एफटीआयआय संस्था आणि अशा प्रकारचे शिक्षण याबद्दल काहीच माहिती नाही. एफटीआयआयमध्ये जे तंत्रशुद्ध शिक्षण मिळते तसे कुठेच दिले जात नाही- ओंकार परदेशी, विद्यार्थी, टिव्ही एडिटिंग ----------------------------------------------------------- पदवी प्रदान सोहळा हा आमच्यासाठी आनंददायी अनुभव होता. आज आमचे करियर ख-या अर्थाने सुरु झाले आहे- शताब्दी रॉय, विद्यार्थी व्हिडिओ एडिटिंग------------------------------------

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयStudentविद्यार्थी