शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

रावण यांना लिहिलेले ढवळे यांचे पत्र देण्यास न्यायालयाचा तुर्त नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 8:18 PM

कोरेगाव भिमा येथे अ‍ॅड. चंद्रशेखर रावण हे शौर्य दिनासाठी पुण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ढवळे यांनी एक पत्र लिहले आहे.

ठळक मुद्देकोरेगाव भिमा शौर्य दिनात कोणताही गोंधळ होवू नये यासाठी खबरदारी से दाखल झाल्यानंतर पत्रावर पुन्हा निर्णय होण्याची शक्यता

पुणे : बंदी असलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेशी संबंध असल्याचा आरोपावरून अटकेत असलेले सुधीर ढवळे यांनी भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर रावण यांना लिहलेले पत्र त्यांना सुपुर्द करण्यास न्यायालयाने तुर्त नकार दिला आहे.     अ‍ॅड. चंद्रशेखर रावण हे कोरेगाव भिमा शौर्य दिनासाठी पुण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ढवळे यांनी एक पत्र लिहले आहे. ते पत्र न्यायालयाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वकिलांद्वारे रावण यांना देण्यात यावे, अशी मागणी ढवळे यांनी केली होती. ती मागणी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांनी नामंजूर करीत स्पष्ट केले की, कोरेगाव भिमा शौर्य दिनात कोणताही गोंधळ होवू नये यासाठी खबरदारी म्हणून तुर्तास ते पत्र देता येणार नाही. त्यामुळे पत्रावर जिल्हा सरकारी वकील उज्जला पवार यांचा से दाखल झाल्यानंतर पत्रावर पुन्हा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील सिद्धार्थ पाटील यांनी दिली. दरम्यान अ‍ॅड. पवार या ४ जानेवारी रोजी यावर से देणार आहे. त्यामुळे संबंधित पत्र रावण यांना शौर्य दिन झाल्यानंतर मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.      पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव पेशवाईचे वारसदार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारधारेची अमंलबजावणी करण्यासाठी ते पुणे पोलिसांना देखील सीबीआयप्रमाणे पिंज-यातील पोपट बनवले आहे, असा उल्लेख या पत्रात आहे. ढवळे यांनी लिहलेल्या या पत्रावर त्यांच्यासह अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या सह्या आहेत.    

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारCourtन्यायालय