कर्णधारपद म्हणून नव्याने संघाची धुरा वाहत असताना काही गोष्टींत नक्कीच बदल करावा लागेल. अर्थात यात फलंदाजीवर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही. ती काळजी घेणार आहे. बऱ्याचदा एका भूमिकेतून दुसºया भूमिकेत गेल्यानंतर त्यातील महत्त्वपूर्ण बदलांना स्वीकारणे गरजेचे असते. त्याशिवाय प्राप्त परिस्थितीवर मात करणे अवघड असते. यापुढील काळात बांग्लादेशचा दौरा असल्याने तिथे जाऊन तेथील हवामानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. याशिवाय खेळपट्टीचा अभ्यास केल्याशिवाय पुढील रणनीती ठरवणे महागात पडते. यापूर्वी सहकाºयांसोबतच्या आठवणी सांगायच्या झाल्यास श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सध्या आहे त्या संघासोबत खेळण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा त्याच खेळाडूंसोबत आशियाई करंडक स्पर्धेसाठी मैदानात उतरायचे आहे.
फरक इतकाच आता सांघिकपातळीवरील नेतृत्वात घ्यावा लागणारा सक्रिय सहभाग. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, सरावावर द्यावा लागणारा भर यांसारख्या अनेक गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका सांघिक पातळीवर सर्वांना एकत्र आणावे लागणार आहे. सर्वांच्या कलेनुसार, एकमेकांना समजून सर्वांच्याच मतांचा आदर करून, त्यावर सामूहिकरीत्या विचार करून कृतिशील अंमलबजावणी करण्यावर भर देणार आहे. दोन ते तीन वर्षांपासून संघातील सर्वच खेळाडूंंना ओळखत असल्याने आमच्यात छान ट्यूनिंग तयार झाले आहे. एकमेकांच्या क्षमता, ताकदीच्या बाजू, कमकुवत क्षेत्र यांविषयी एकमेकांसोबत मोकळ्यापणाने चर्चा करण्याइतपत आमच्या मैत्रीमध्ये मोकळेपणा निर्माण झाल्याने याचा सकारात्मक परिणाम आमच्या सर्वांच्या कामगिरीवर होणार आहे. पर्यायाने संघाची ताकद वाढणार आहे. या सर्वांबाबत मला आपल्या वरिष्ठ संघाचा आदर्श घ्यावासा वाटतो. आता इंग्लंडमधील दौºयात त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या कामगिरीमध्ये कमबॅक केले आहे ते दाद देण्यासारखे आहे. कठीण काळात असताना कशा पद्धतीने जोरदार पुनरागमन करायचे, हे आपल्या भारतीय संघाकडून शिकता येते. हे त्यांनी इंग्लंडच्या दौºयातून दाखवून दिले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर आहे. त्याच्या कर्णधारपदाबद्दल जगभरात त्याची वाहवा होते. संयम, चतुराई, निर्णयक्षमता आणि सहकाºयांना ज्या पद्धतीने तो पाठिंंबा देतो त्यातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असलेला संघदेखील आत्मविश्वासाने यशाला गवसणी घालताना दिसतो. धोनीचा आदर्श नेहमीच प्रेरणादायी आहे. यापूर्वी संघात फलंदाज म्हणून एक वेगळी भूमिका वाट्याला होती. आता फलंदाज आणि कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत सामोरे जावे लागणार आहे. संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उभे राहताना आपल्या खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देत राहणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे महत्त्वाचे असते. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढीस लावण्यासाठी कर्णधार म्हणून निर्णय घेणे आवश्यक असते. सर्वांकडून विजयी कामगिरी करून घेण्यावर यापुढील काळात भर असणार आहे. त्यासाठी सर्वांची परिश्रम घेण्याची तयारी आहे. एखाद्या खेळाडूला वेळीच संधी देऊन त्याच्याकडून उत्कृ ष्ट कामगिरी करून घेणे हे कर्णधाराचे काम आहे. संघात सर्वच जण चांगले मित्र आहेत. फरक इतकाच, की मित्रत्वाच्या नात्याबरोबर कर्णधार म्हणून शिरपेचात नवीन तुरा खोवला गेला आहे. खेळात हार जीत सुरू असतेच. मात्र याबरोबर मैदानावर प्रत्येकाने शंभर टक्के प्रयत्न करून आपल्यातील सर्वोत्कृष्ट द्यावे, यावर प्रामुख्याने भर असणार आहे.श्रीलंकेच्या दौºयावर असल्यापासून संघातील सर्वांसोबत आपुलकीचे आणि भावनिक नाते तयार झाले आहे. आता तर केवळ फलंदाज म्हणून नव्हे, तर कर्णधारपदी भूमिका साकारताना सामूहिक पातळीवर विचार करावा लागणार आहे. खेळपट्टीवर इतर अकरा खेळाडूंसमवेत आपले कौशल्य पणाला लागणार असून त्यातून यशाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. संघातील सर्वच सहकाºयांसोबत योग्य समन्वय साधल्यास यश आपलेच आहे. आगामी आशियाई करंडक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून पिंपरीच्या पवन शहा याची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद...