"एवढा मोठा रोहित नाही"; अजित पवारांनी पुतण्याला झिडकारलं

By प्रकाश गायकर | Published: January 6, 2024 05:53 PM2024-01-06T17:53:35+5:302024-01-06T17:57:58+5:30

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले.

Not so big Rohit pawar; Ajit Pawar scolded his nephew | "एवढा मोठा रोहित नाही"; अजित पवारांनी पुतण्याला झिडकारलं

"एवढा मोठा रोहित नाही"; अजित पवारांनी पुतण्याला झिडकारलं

पिंपरी : स्वायत्त संस्था या स्वतंत्रपणे काम करत असतात. माझ्यावर देखील अनेक वेळा कारवाई झाली. मात्र त्यातून समोर काहीच आलं नाही. रोहित वर कारवाई झाली त्यानंतर रोहित काय प्रश्न करतोय? तसेच त्याच्या प्रश्नावर उत्तर द्यायला तो इतका मोठा नाही अशी अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड येथील मोशी मध्ये कार्यकर्ता मेळावा आहे. त्यापूर्वी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले. त्यानंतर रोहित पवार यांनी आठ दिवसापूर्वी दिल्लीला कोण गेले होते हे तपासा असा प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केला. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, कोण कधी आणि कुठे गेला होता याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही. त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते व कार्यकर्ते उत्तर देतील. राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या स्वायत्त आहेत. त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. जर काही केलेले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही."

राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभारल्या?

 नुकतीच राज ठाकरे यांनी हे सहकार चळवळीच नाही तर सहारा चळवळीचे सरकार आहे अशी टीका केली होती. त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी किती सहकारी संस्था उभारल्या हे त्यांनी सांगावे. मी आत्तापर्यंत 32 वर्षात सहकारी संस्थांच प्रतिनिधित्व करतोय. सहकारी बँकांमध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी बँका रसातळाला जातात. त्यामध्ये सर्वसामान्य माणसांचे नुकसान होते. त्यामुळे सहकार चळवळ चालवणे इतके सोपे नाही. राज ठाकरे काहीही बोलतील अशी टीका पवार यांनी केली.

Web Title: Not so big Rohit pawar; Ajit Pawar scolded his nephew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.