केंद्र सरकार राज्याच्या मदतीला, सगळीकडून रसद : प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 04:57 PM2021-04-10T16:57:48+5:302021-04-10T18:51:41+5:30
केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला आहेच, सर्वतोपरी सहकार्य देणारच आहे.
पुणे : आतापर्यंत महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख डोस मिळाले आहेत. त्यापैकी ९५ लाख वापरले असून १५ लाख ६३ हजार व्हॅक्सिन शिल्लक आहेत. मात्र शिल्लक लसींचे योग्य वाटप झाले पाहिजे.याचे नीट वाटप झाले पाहिजे. म्हणजे असा बोर्ड लागणार नाही. आरोप- प्रत्यारोपाची वेळ नाही. आम्ही राजकारणाचे उत्तर जरुर वेगळं देऊ असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहे.यावेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हजर आहे.
जावडेकर म्हणाले, आज कोरोनाच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्यायला चर्चा केली.विस्तृत कार्यक्रम ठरला आहे.
शनिवारी जनता कर्फ्युप्रमाणे लॉकडाऊन पाळला आहे. तसेच महाराष्ट्राला केंद्राकडुन ११२१ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत ७०० गुजरात उरलेले तामिळनाडूमधुन आले आहे.
मनुष्यबळाची जी आवश्यकता आहे त्यालाठी नॅशनल हेल्थ मिशनमधुन केंद्र सरकार पैसे देणार आहे.हे आमचेच राज्य आहे. केंद्राच्या ३० टीम महाराष्ट्रात कार्यरत आहे. केंद्र सरकारने काय करायला पाहिजे याचा अभिप्राय त्यांनी तयार केला आहे, असेही जावडेकर म्हणाले.